कोविडवरून उल्हासनगरात शिवसेना-मनसे आमने-सामने !

कोविडवरून उल्हासनगरात शिवसेना-मनसे आमने-सामने !

कोविडवरून उल्हासनगरात शिवसेना-मनसे आमने-सामने !

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरसाठी चार डिझेलदाहिन्यांची सुविधा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी समाजमाध्यमांत दिल्यावर मनसे शहरप्रमुख बंडू देशमुख यांनी ‘ उल्हासनगरला डिझेलवाहिन्यांची गरज नसून, माणसं जगवण्यासाठी चांगल्या कोविड हाॅस्पिटलची आवश्यकता आहे ‘, अशी टीका केली आहे.

” पालकमंत्री साहेब व खासदार साहेब, आम्हांला लोकांना जाळण्यासाठी डिजलदाहिनी नकोय. आम्हांला आणि आमच्या शहराला आज गरज आहे, ती वेन्टिलेटर व आॕक्सिजन बेडची ! साहेब प्लिज, लोकांना वाचविण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा ; आम्हांला एक सुसज्ज कोविड रुग्णालय हवंय, डिजलदाहिनी नाही. आम्ही माणूस मेल्यावर कुठेही जाळू ; पण लोकांना वाचविण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा ” असं ट्वीट बंडू देशमुख केल्यानंतर उल्हासनगरात शिवसेना-,मनसे आमने-सामने आले आहेत.

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मनसेवर पलटवार करताना मिडियाभारत न्यूज ला प्रतिक्रिया दिलीय की उपचारांसाठीचे आवश्यक यथायोग्य आदेश पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना दिले असून आयुक्तांनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत जो कृती आराखडा मांडलाय, तो अंमलात आला तर उल्हासनगर नक्कीच कोरोनामुक्त होईल.

राहिला प्रश्न टीकाकारांच्या तर बाहेरून टीका करणं सोपं असतं, पण सत्तेत राहून परिणाम साधणं कठीण असतं. मनसेने आपली नाशिकमधली सत्ता हातातून का गेली, त्यावर विचार करावा ! असंही चौधरी म्हणाले.

नगरसेवक मंडळी घरात लपून बसलेली असताना काही मोजके कार्यकर्ते जोखीम घेऊन मैदानात उतरून करताहेत. त्यांना जमीनी वस्तुस्थिती माहित आहे. कागदावरच्या योजना, तोंडी आदेश आणि वास्तव यात फरक आहे, असं चौधरींच्या प्रतिक्रियेवर बंडू देशमुख म्हणालेत. हा काळ राजकारण करण्याचा नसून आम्हाला आमच्या शहरातली माणसं जगवायचीत, असं ते म्हणाले.

News by Praful Kedare

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!