आॅनलाईन साधनं नसलेल्या विद्यार्थ्यांकडे शासनाचं दुर्लक्ष ! भाजपा शिक्षक आघाडीचा आरोप

आॅनलाईन साधनं नसलेल्या विद्यार्थ्यांकडे शासनाचं दुर्लक्ष ! भाजपा शिक्षक आघाडीचा आरोप

आॅनलाईन साधनं नसलेल्या विद्यार्थ्यांकडे शासनाचं दुर्लक्ष ! भाजपा शिक्षक आघाडीचा आरोप

राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप आहेत, असे गृहीत धरून शासन आॅनलाईन शिक्षणाच्या घोषणा करीत आहे. मात्र, जिओ व गुगलक्लासरूमद्वारे शिक्षण देऊ पाहणाऱ्या शालेय शिक्षण विभागाचे ऑनलाईन सुविधा नसलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मुंबई प्रदेश भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक अनिल बोरनारे यांनी केला आहे.

 

हेही वाचा : महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात आता गुगल क्लासरुम !

 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा बंद असून शिक्षक ऑनलाईन शिक्षण देत आहेत. शासनाने गुगल क्लासरूम सुरू केल्याची घोषणा केली, पण त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत, असला तरी काम व उद्योगधंदे बंद असल्याने नेट पॅक साठी पैसे नाहीत. दुर्गम, आदिवासी भागात इंटरनेटची रेंज नसल्याने लाखो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला मुकणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत शासनाने कोणतीही व्यवस्था केलेली नाही, असं बोरनारे यांनी सांगितले.

जून महिन्यात शालेय शिक्षण विभागाने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल, टीव्ही संच, लॅपटॉप व डेस्कटॉप नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभागाने तातडीने पाऊले उचलण्याची गरज असल्याची मागणी बोरनारे यांनी केली आहे.

News by MediaBharatNews Team

मिडिया भारत न्यूज च्या युट्यूब चॅनलवर ही बातमी पाहण्यासाठी क्लिक करा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!