मोदी सरकारचा स्टीफन हाॅकिंग निघाला तोतया

मोदी सरकारचा स्टीफन हाॅकिंग निघाला तोतया

मोदी सरकारचा स्टीफन हाॅकिंग निघाला तोतया

 

स्टीफन हाॅकिंग नावाने एक फेसबुक पेज बनतं. /

https://www.facebook.com/hari.scientist

ही त्या पेजची लिंक!!!

ते स्टीफन यांचं अधिकृत पेज नव्हतं. पण भारतात मूर्खांची कमी नाही. लोक त्या पेजवर जाऊन अकलेचे तारे तोडू लागले. आश्चर्यकारकरित्या त्या पेजवर भारतीय जास्त आढळतात. नीट अवलोकन केलं तर एका ठराविक विचारसरणीची मंडळी तिथे वावरताना आणि चर्चांतून एक पूर्वनियोजित मतैक्य घडवण्याच्या प्रयत्नात दिसतात.

त्याच पेजवर तोतया स्टीफन हाॅकिंग १० नोव्हेंबर, २०११ रोजी आपलं मत मांडतो की,

Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2.

The Satapatha Brahmana 7-1-2-23 and Gayatri Mantra talk about Universe being threefold (triloka): Prithvi (Earth), Antariksha (the space in between) and Dayu (Heaven). Krishna Yajurveda 23.12 (7-4-45) 43 Pannam-18th Anuvakam-45th Panasa suggests the existence of a softer intermediate space called Pilipila. Modern science says the matter and energy are interchangeable but the Vedic science says there is Pilipila in between.the two.(Ref: Modern Science in Vedas- 1 and 2 by  Dr. Sakamuri sivaram Babu and Arjunadevi-Guntur-A.P.India published in 2007). Both Vedic and modern science agree upon a continuous dance of creation and annihilation of particle energy everywhere in the universe – Siva tandavam as per Hindu mythology, Rigveda discusses this cycle in detail.

Vedic View: The Universe rotates, shaped like an egg.

Modern View: The Universe is still and it resembles the surface of a sphere.

McCauley’s Educational Act of India (dated Feb 2nd 1854) aims at transforming Indians to be English in taste, morals and opinion. I strongly feel the process of westernization has brought about a psychological slavery among Indians who’d opt to be Engineers rather than Vedic scholars, given a choice.

To conclude, Vedas are a vast storehouse of knowledge, abundant information and solutions waiting to be discovered by dedicated youngsters

या पोस्टचे २१५ शेअर्स झाले. आणि फक्त ३४ काॅमेन्टस्!!!

त्यापैकी एक काॅमेन्ट शंतनु सचदेव याची असते,

is this hawkin’s real account ? because I find it fake !!

त्या काॅमेन्टखाली मायकेल चान्डलर यांची काॅमेन्ट येते,

There is no scientific validation of the Vedas. If you think there is, you do not understand the word “science.” Here’s the real Hawking page, btw:

https://www.facebook.com/stephenhawking

अशा अनेक काॅमेन्टस् मधून शंका उपस्थित झाल्यावर पेज म्हणतं,

I never said this is real account of stephen hawking.

Just created a page on his name.

त्यावर शेख निझामुद्दीन यांची काॅमेन्ट येते,

It is bullshir :D…..  see what u hv done….

http://serveveda.org/?p=650

ही तीच वेबसाईट आहे, ज्यांनी तोतया स्टीफन हाॅकिंगची पोस्ट शेअर करून दावा केला की स्टीफन हाॅकिंग तेच सांगतोय, जे आम्ही इतकी वर्ष सांगतोय की वेदांनीच मूळ विज्ञान सांगितलेलं आहे.

ही वेबसाईट I – SERVE या संस्थेची आहे.

या संस्थेच्या परिचयात दिलेली माहिती अशी की,

I-SERVE (Institute of Scientific Research on Vedas) is a scientific research institute dedicated to dig out the technical details of Vedic sciences from ancient Indian literature. It is registered as a charitable non-profit making Trust by a group of scholars & scientists well versed both in ancient and modern sciences. It is recognized as a SIRO (scientific and Industrial Research Organization) by DSIR (Dept of Scientific & Industrial Research, Ministry of Science & Technology, Govt. of India).

या संस्थेने तोतया स्टीफन हाॅकिंगच्या पोस्टसंदर्भात खऱ्या स्टीफन हाॅकिंगला मेल पाठवला व त्याचा आॅटोमेटेड रिप्लायला सकारात्मक प्रतिसाद समजून तोतया स्टीफनच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केलं.

I-SERVE ही संस्था भारत सरकारच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी मंत्रालयाने सायंटिफिक आणि इंडस्ट्रीअल रिसर्च संस्था म्हणून मान्यता दिलेली असल्याने त्या खात्याच्या मंत्र्याने, अर्थात डाॅ. हर्ष वर्धन यांनी स्टीफन हाॅकिंगचा हवाला देऊन वैदिक सायन्सची भलामण करून टाकली, तीही विज्ञान परिषदेत!!!

असल्या प्रकारांनी देशाची नामुष्की होते, त्याची चाड ना संबंधित मंत्र्यांना, ना सरकारला, ना सरकारात बसलेल्या पक्षाला, ना त्यांच्या बुध्दीबधीरतेचं हास्यास्पद निर्लज्ज समर्थन करणाऱ्या कोडग्या समर्थकांना.

संबंधित पेज तोतया स्टीफन हाॅकिंगचं आहे, हे उघड होऊन ७ वर्ष झाली. पण I-serve ने आपल्या वेबसाईटवरून दिशाभूल करणारी माहिती अद्याप काढलेली नाही. तिचाच धागा पकडून मोदी सरकारने अकलेले तारे तोडले. देशातील वैज्ञानिकांऐवजी अडाणी भोंदू बाबांवर विसंबून असलेलं सरकार या देशातल्या सुशिक्षित युवा वर्गाने शक्य तितक्या लवकर उखडून फेकणं किती आवश्यक झालं आहे, तेच या प्रकरणातून दिसून येतं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!