मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
भारतीय जनता पार्टीचे नेते शिवसेनेचा उल्लेख करताना सोनिया सेना असा करतात ! सोनिया गांधी या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष आहेत. संसदेच्या सन्माननीय सदस्य आहेत. त्यांच्या नावाचा टिंगल-टवाळी साठी वापर करणं योग्य नाही, असं नमूद करतानाच काँग्रेसचे मराठवाड्यातील युवा नेता हनुमंत पवार यांनी सोनिया गांधींची बदनामी थांबविण्याचा इशारा भाजपला दिला आहे. यासंदर्भात पवार यांनी फेसबुकवर मजकूर प्रसारित केला आहे. पवार यांचं म्हणणं त्यांच्या शब्दात…
सध्या भाजपवासी असलेल्या चित्राताई वाघ अनेक दिवसांपासून शिवसेनेचा उल्लेख माध्यमांत ‘सोनिया सेना’ असा करत आहेत. ताईंना नम्र विनंती, हे बंद करा. तुमची अभिव्यक्ति कोणातरी महिलेची बदनामी करत असेल तर ते तुम्हांला अपेक्षित आहे का ?
शिवसेनेवरचा राग सोनियाजींवर काढू नका, टीका करायचीय तर थेट शिवसेना,काँग्रेसचं नाव घेऊन करा. आमचं कांहीं म्हणणं नाही. शिवसैनिक, काँग्रेस कार्यकर्ते तुमच्या टिकेला उत्तर द्यायला समर्थ आहेत. सोनीयाजींच्या ‘गांधी’ आडनावाला, शिवसेना शब्दातील ‘शिव’ शब्दाची तुम्हांला एवढी ऍलर्जी का ?
आमचा पक्ष सर्व स्रियांचा आदर करायला शिकवतो, म्हणून आंम्ही शांत आहोत. आपली संस्कृती महिलांचा आदर करायला शिकवते. तुमच्या विरोधात टिका करताना मराठी भाषेच्या शस्त्रागारातील तिरकस, द्वीअर्थी शब्द आंम्हीही वापरू शकतो. आमच्या महिला नेत्यांचा सन्मान करा किमान बदनामी करू नका, विनंती.
सोनियाजींचे पती देशाचे पंतप्रधान होते, भारतरत्न या सर्वोच्च किताबाने त्यांना गौरविले आहे, त्यांनी देशासाठी प्राण दिले. आजच्या तुमच्या शूद्र राजकीय हेतूंसाठी सोनीयाजींवर घसरू नका. त्या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा संसद सदस्य आहेत.याचे भान ठेवा.
राजकीय टिका टिप्पणी करताना स्रियांच्या व्यक्तीमत्वाचा अपमान, मानहानी व वैयक्तीक उपहास, टिंगल रोखण्याची जबाबदारी ओळखा.
आदरणीय शरद पवार साहेबांना आपण वडिलांच्या ठिकाणी मानता म्हणून ही विनंती करण्याचं धाडस. अवधूत वाघ आणि चित्रा वाघ या व्यक्तिमत्वांत फरक आहे, तो पुसायची घाई करू नका.
ही नवी काँग्रेस आहे, करारा जवाब मिलेगा !!
मराठवाडा उपाध्यक्ष, किसान काॅंग्रेस
Ramdas Khot
एकदम बरोबर आहे सोनिया गांधीच्या पायाची किंमत नाही कशाला बोलतो