बलात्कार पीडितेचा पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न !

बलात्कार पीडितेचा पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न !

बलात्कार पीडितेचा पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न !

महिन्याभरापूर्वी पोस्को कायद्याखाली बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असतानाही आरोपींना अटक करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत अल्पवयीन पीडिता आणि तिचे आई-वडीलांनी पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगरात घडली आहे.

उल्हासनगरातील माजी आमदार पप्पू कालानीचा मुलगा ओमी कलानी याच्या टीओके या राजकीय आघाडीचे सदस्य पंकज त्रिलोकांनी आणि रोशन माखिजा यांच्यावर एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे.

सदर बाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे, मात्र आरोपींना अटक झालेली नव्हती. आठवड्याभरापूर्वी संबंधित आरोपींना पोलीस ठाण्यात अधिकार्‍यांसमवेत गप्पा मारत बसल्याचं पाहिलं असल्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यामुळेच आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आत्मदहनाचं टोकाचं पाऊल पीडितेने उचललं, असं समजतं.

या संदर्भात उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं की संबंधित पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना तपासाबाबत काही आक्षेप होते. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं मनपरिवर्तन करण्यात आलं आहे.

पोस्को कायद्याखालील गंभीर गुन्ह्यांत पोलिस तत्परतेने कारवाई का करत नाहीत, या प्रश्नावर वपोनि कदम म्हणाले की तपास सुरू आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये, हेही पाहावं लागतं.

पीडितेच्या तक्रारीबाबत पोलिस साशंक आहेत का असं थेट विचारल असता वपोनि कदम म्हणाले की त्यावर सविस्तर बोलता येणार नाही. सदरबाबत तपास सुरू आहे.

दोघे आरोपी टीओके या राजकीय आघाडीचे सदस्य आहेत. सध्या टीओकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं राजकीय पाठबळ आहे.

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओमी कलानीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत घेण्याचे प्रयत्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चालवले आहेत.

टीओकेवर यापूर्वीही गुन्हेगारीचे आरोप झाले आहेत. त्यातच आता या आघाडीच्या सदस्यांवर बलात्काराचा आरोप झाल्याने त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

संबंधित विडिओ इथे पाहा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!