रामाची सोय झाली, पण रोटीचा पत्ता नाही ! उत्तरप्रदेशमध्ये उपासमारीमुळे वाढल्या आत्महत्या

रामाची सोय झाली, पण रोटीचा पत्ता नाही ! उत्तरप्रदेशमध्ये उपासमारीमुळे वाढल्या आत्महत्या

रामाची सोय झाली, पण रोटीचा पत्ता नाही ! उत्तरप्रदेशमध्ये उपासमारीमुळे वाढल्या आत्महत्या

करोना महामारीच्या काळात उत्तरप्रदेश सरकारने जनतेसाठी ज्या घोषणा केल्या. आमच्यासाठी राम आणि रोटी दोन्ही महत्वाचं आहे, असं वक्तव्य करून मुख्यमंत्री अजय सिंग बिष्ट यांनी लोकभावनेला हात घालण्याचाही प्रयत्न केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांसमोर वेळोवेळी समाजातील वंचित घटकांना मोफत अन्नधान्य मिळणार अशा प्रकारच्या घोषणा केल्या पण विविध माध्यमांमधुन जोरदार घोषणा पसरवल्या जात असल्या तरी वास्तव त्यापासून मैलो दूर असल्याच चित्र आहे. गेल्याच आठवड्यात उत्तरप्रदेश मध्ये पाच लोकांनी आत्महत्या केली. पैकी तीन एकाच कुटुंबातील होते. लॉकडाऊन काळात अन्नधान्य न मिळाल्यामुळे पाच जणांवर आत्महत्या करण्याची वेळ आली.

विद्या धाम समितीचे राजा भैया प्रत्येक वेळी सरकारच लक्ष उत्तरप्रदेश मध्ये होणा-या आत्महत्येकडे वेधत होते, पण सरकार त्याकडे अजिबात लक्ष देत नसल्याच त्यांनी सांगितलं. राजा भैयांच्या म्हणण्यानुसार “उत्तरप्रदेश मध्ये हल्ली ज्या आत्महत्या होत आहेत त्याचं एकमेव कारण उपासमार आहे”

उत्तरप्रदेशमधील आत्महत्तेचं सत्र थांबत नाहीय. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. महोबा क्षेत्रात येणा-या गुढा गावात रहाणा-या प्रदीपने गुरुवारी मध्ये रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिस अधिक्षक विरेंद्र कुमार ह्यांच्या म्हणण्यानुसार ही आत्महत्या दारिद्रय आणि नैराश्यातून झालेली आहे.गावातील रेशन दुकानदाराला वेळोवेळी धान्याची मागणी करुनही प्रदीपच्या कुटुंबीयांना अन्नधान्य न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

दुसरीकडे महोबाच्या पनवारी परिसरातील मसूदपुरा येथे नरेंद्र राजपूत या तरुण मुलांनी आपली जिवनयात्रा संपवली. तो स्थलांतरीत मजुर होता. तो काही दिवसापूर्वी पुण्याहून उत्तरप्रदेशमध्ये आपल्या गावी आला होता. त्याला वाटल की आपल्याला उत्तरप्रदेश सरकार कडून रेशन पाणी मिळेल पण तस झालं नाही म्हणून ह्या युवकाने आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचललं.

झांसी येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. अगदी काही दिवसापूर्वीच त्या परिवारातील एका मुलीचा जीव उपासमारीने घेतला होता. आत्महत्या करण्यापूर्वी ह्या कुटुंबाने एक सुसाइट नोट लिहली त्यात आत्महत्येच स्पष्ट कारण लिहलं-आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,काही दिवसापूर्वी आमची मुलगी अन्न न मिळल्यामुळे आम्हाला सोडून गेली. दारिद्रय आणि नैराश्याचा आम्ही एकाच वेळी सामना करत आहोत. पण आता ते अशक्य झालं असून आम्ही आमची जिवनयात्रा संपवतो आहोत.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जाहीर केले की प्रत्येक गरीबांना मोफत रेशन मिळेल. परंतु वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. उत्तरप्रदेशातील सुमारे 30 टक्के पात्र गरीब यापासून वंचित आहेत. प्रयागराजमधील करछना तहसील अंतर्गत बागबाणा गावचे सरपंच शीतला प्रसाद पांडे म्हणतात की, “हमारी कोई सुनने को ही नहीं तय्यार नहीं है (कोणीही आमचे म्हणणे ऐकण्यास तयार नाही).

सरकारच्या घोषणेत असे म्हटले आहे की ज्याच्याकडे रेशनकार्ड नाही, त्याला तात्पुरते कार्ड मिळेल आणि अशी लोक राशन मिळवण्यास पात्र असतील मी स्वत गावातील ५४ लोकांच्यासाठी तात्पुरत्या कार्डसाठी अर्ज केला आहे, परंतु मला अद्याप शासन किंवा प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही”

भुंडा गावचे सरपंच रामलाल म्हणतात की “लखनौमध्ये सरकार घोषणा करते पण त्यानंतर कोणताही करत नाही. ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहेत त्यांना अन्नधान्य मिळत आहे, पण ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही आहे त्यांचे काय?ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांना तात्पूरते कार्ड दिले जातील पण प्रशासनाकडून आमच्या गावात एकालाही असे कार्ड मिळाले नाही. कार्ड मिळवण्यासाठी सरकारी बाबू लोक आमच्याकडे २०० रुपयांची मागणी करत आहेत.”

उत्तरप्रदेश सरकार दररोज नविन नविन घोषणा जाहिर करत आहेत. पण त्या फक्त मिडिया पुरत्या मर्यादित आहेत. ग्राऊंडवर वास्तव पूर्णतः वेगळे दिसून येते.मोफत रेशन कार्ड असेल, टोल नाक्यावर मोफत जेवणाची व्यवस्था असेल, मजुरांस १००० रुपयांचा निर्वाह भत्ता असेल इ.सर्व घोषना ह्या फोल ठरलेल्या आहेत.

उत्तरप्रदेश राज्यातल्या ग्रामपंचायतींनी असा दावा केला आहे की त्यांच्या ग्रामसभेतील कोणालाही १००० रुपये मिळाले नाहीत.ग्रामस्थांच्या जनधन खात्यात उत्तरप्रदेश सरकारचा एकही रुपया जमा झाला नाही.पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत मिळणारे २००० रुपये आम्हाला मिळाले मिळाले पण करोना काळात आम्हाला एक छद्दाम देखील मिळाला नाही. समजा आम्हाला सरकारने निर्वाह निधी दिलाही तर ज्यांच्याकडे बँकेच खातच नाही त्यांच काय? असा सवाल ग्रामस्थ वेळोवेळी सरकारला विचारत आहेत.

उत्तरप्रदेश मधील कथित रामराज्यात दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत. शासन,प्रशासनाची नियोजन शुन्यता वेळोवेळी दिसून येत आहे. आई कडे धाव घेणा-या मुलांनाही आत्महत्या करावं लागत आहे ही बाब अतिशय वेदनादायी आहे.

News by Ankush Hambarde Patil


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!