ज्या संस्थेत आपण आपलं शालेय शिक्षण घेतलं, तिचं आपण देणं लागतो आणि तिथून बाहेर पडून भविष्यात स्थिरस्थावर झाल्यावर त्याची परतफेड करायची असते, याची जाणीव लोकांमध्ये अभावानेच आढळते ; पण मालवण तालुक्यातील असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिरातील माजी विद्यार्थी त्याला अपवाद ठरलेत.
शाळेतील २००९-१० शालांत बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्त केलेल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत पोर्टेबल साऊंड सिस्टीम यंत्रणा प्रदान केली. काही दिवसांपूर्वीच २०१०-११ च्या बॅचने शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले होते.
या यंत्रणा शाळेच्या सहशालेय कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. शाळेशी असलेल्या संपर्कातून शाळेची गरज विद्यार्थ्यांना कळली होती. आपसात समन्वय करून त्यांनी लगेच तिची पूर्तता केली, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सुशांत रावसाहेब पाटील यांनी मीडिया भारत न्यूज ला दिली.

आदित्य सावंत, दयानंद कदम, प्रतिक सावंत, सत्यवान कोकम, सुर्यकांत खरात, मीनाक्षी सावंत या माजी विद्यार्थ्यांनी सदर कामी पुढाकार घेतला. प्रतिक सावंत, आदित्य सावंत, प्राची सावंत, सुशांत परब, श्रीपाद राणे, ममता परब, मयुरी सावंत, विनायक सावंत, विद्या मिरजकर, अमोल घाडी, भगवान कोकरे , दिपाली मेस्त्री, मीनाक्षी सावंत, सुरेंद्र सावंत, गोविंद राणे, ममता राणे, दिपाली आडेलकर, सुनील राणे, अभय राणे, राजेश घाडीगांवकर, दयानंद कदम, सुर्यकांत खरात, लवू शिंदे, दीपक घाडीगावकर, सत्यवान कोकम, समीर सावंत यांनी मिळून शाळेला गुरुदक्षिणा दिली.

आवश्यक यंत्रणांसाठी निधी जमा करुन शाळेला गुरुदक्षिणा दिल्याबद्दल २००९-१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विजय सावंत, सचिव प्रकाश सावंत आणि सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुशांत पाटील, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.