भारतीय राजकारणातलं प्रभावी महिला नेतृत्व हरपलं

भारतीय राजकारणातलं प्रभावी महिला नेतृत्व हरपलं

भारतीय राजकारणातलं प्रभावी महिला नेतृत्व हरपलं

कपाळावरील मोठी लाल टिकली, भांगामध्ये सिंदूर, मोठ्या काठांची कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ही सुषमा स्वराज यांची जनमानसावर ठसलेली प्रतिमा.

संसदेचे सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या. १९७७ मध्ये अवघ्या २५ वर्षांच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या.

त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले. १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या २००० – २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर इ.स. २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून ४००,००० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल्या.

अमेरिकेतील प्रसिद्द दैनिक वॉल स्ट्रीट जर्नल यांनी स्वराज यांना भारताच्या ‘आवडत्या राजकारणी’ म्हणून ओळख दिली.

सुषमा स्वराज किंवा चिंकू स्वराज (पूर्वाश्रमीच्या शर्मा)  १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे हरदेव शर्मा आणि श्रीमती लक्ष्मी देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात स्थायिक झाले आहेत. स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले असून संस्कृत व राज्यशास्त्रातून पदवी प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील म्हणूनही त्या कार्यरत होत्या. सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व होतं.

सुषमा स्वराज या प्रामुख्यानं समोर आल्या, जेव्हा त्या १९९९मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात निवडणुकीत उभ्या राहिल्या. ही निवडणूक त्या हरल्या. त्यानंतर २००४मध्ये जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसनं पुढं आणलं, तेव्हा सुषमा स्वराज यांनी त्याचा खूप विरोध केला. देशातील सर्वोच्च स्थानी जर परदेशी महिलेला बसवलं तर स्वत:ला बोडकं करणार… सुषमा स्वराज यांच्या या धमकीनंतर देशात एक मोठं नाट्य घडलं होतं.

सुषमा यांनी मिझोरमचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांच्यासोबत विवाह केला. आपल्या वक्तृवानं सुषमा यांनी भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचवला. सुषमा स्वराज यांना पंतप्रधानपदानेही चकवा दिला आहे. सुरुवातीला त्यांनीही पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाचा विरोध केल्याचीही चर्चा होती. जर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीला मॅजिक फिगर गाठता आलं नसतं, तर पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव पुढं येण्याची शक्यता होते, पण मोदींच्या राजकीय प्रभावापुढे त्यांचं काही चाललं नाही. अलिकडेच एका पासपोर्ट प्रकरणात पक्षाच्याच समर्थकांकडून सुषमा स्वराज यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना डावलण्यात आलं होतं, पण त्यांनी पक्षाविरोधात कोणतंही वक्तव्य कधी केलं नाही. सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातलं प्रभावी महिला नेतृत्व हरपले.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!