समलैंगिकांबद्दलची सहानुभूती समाजमाध्यमापुरतीच ! ब्रोजेन आणि अंकुरला करावी लागली आत्महत्या !

समलैंगिकांबद्दलची सहानुभूती समाजमाध्यमापुरतीच ! ब्रोजेन आणि अंकुरला करावी लागली आत्महत्या !

समलैंगिकांबद्दलची सहानुभूती समाजमाध्यमापुरतीच ! ब्रोजेन आणि अंकुरला करावी लागली आत्महत्या !

२०१८ ला जेव्हा ह्या कलम ३७७ रद्द करण्यात आले. समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर, अख्खा सोशल मिडिया सप्तरंगी रंगात न्हावून निघाला. समलैंगिक जोडप्यांच्या बाजूने हजारो पोस्ट/लेख शेअर झाले. भारतातल्या समलैंगिक नागरिकांच्या अभिव्यक्तीला कायदेशीर मान्यता मिळाली म्हणून अभिनंदनाचे मेसेजेस फिरू लागले; पण ह्या सगळ्या ‘सोशल मिडिला रिअॅलिटीपेक्षा सोसायटी रिअॕलिटी आजही भारी पडते आहे, ही शोकांतिका आहे.

अशीच एक शोकांतिका आसाममध्ये घडली आहे.ती आहे समलैंगिक मैत्रीची शोकांतिका.

आसाममधील ब्रोजेन ठाकुरिया आणि अंकुर निलीम दास या मित्रांनी आत्महत्या केली आहे.अंकीत आणि ब्रोजेनचे एकमेंकांवर प्रेम होते.सामाजिक बंधनं झुगारून दोघे आपल्या प्रेमाच्या वाटेवर चालत राहिले. त्यांनी त्यांचं नातं समाजापासून लपवण्याचा प्रयत्नही केला नाही आणि अगदी उघडपणे हातात हात घालून फिरणे, बागेत फिरायला जाणे, सिनेमा पाहणे, फोटो काढणे आणि आपल्या प्रेमातील आनंदी क्षणांचे फोटो फेसबुकवर टाकणे सुरू होतं. आपला आनंद आपल्याच प्रेमात शोधणारे हे दोन तरुण होते.

ह्यांच्या प्रेमाला सोशल मिडियावरील लोकांनी स्वीकारलंही, पण वास्तव फार वेगळं होतं. दोघे जिथे राहायचे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना तर सोडाच, पण त्यांच्या कुटुंबालाही त्यांचं नातं मान्य नव्हतं. कुटुंबातील लोकांच्या सततच्या बोलण्यामुळे दोघेही प्रचंड तणावाखाली वावरत होते. एका बाजूला समाज तर दुस-या बाजूला स्वत:च्या प्रेमाची अभिव्यक्ती ह्या दोन पात्याच्या कात्रीत ते सापडले.

अशातच ब्रोजेनच्या आईचे निधन काविळीच्या आजाराने झालं. पण कुटुंबातील लोकांनी नातेवाईकांनी आणि शेजारी लोकांनी ह्याचा दोष ब्रोजेनवर ठेवला.

ब्रोजेनच्या समलैंगिक नात्याचं दडपण असल्याच्या तणावामुळेच त्याची आई गेली, असा शिक्का त्याच्यावर मारण्यात आला. ह्या सगळ्या तणावाला सामोरे जाताना दोघांनीही खचून जाऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

सोशल मिडियावरील स्विकृती ही वास्तवापासून कोसो दूर लांब असल्याची साक्ष देणारी ही घटना आहे. असे कितीतरी अंकुर आणि ब्रोजेन सामाजिक दबावाला बळी पडून आपला जीव देतात ! त्यांची नोंदही होत नाही.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!