मंगळदोषाच्या भीतीने शिक्षिकेने लग्नासाठी आपल्याच विद्यार्थ्याला धरलं वेठीला !

मंगळदोषाच्या भीतीने शिक्षिकेने लग्नासाठी आपल्याच विद्यार्थ्याला धरलं वेठीला !

मंगळदोषाच्या भीतीने शिक्षिकेने लग्नासाठी आपल्याच विद्यार्थ्याला धरलं वेठीला !

एखाद्या खुळचट समजुतीला विरोध केला तरीही तो धर्मालाच विरोध आहे, असं म्हणण्याचा अट्टाहास धार्मिक मंडळी करत असतात. त्यात स्वतःला शिक्षित सुसंस्कृत साहित्यिक म्हणवणारी मंडळीसुद्धा मागे नसतात. खरंतर अशावेळी या लोकांचा कथित शिक्षित असल्याचा तसंच सुसंस्कृतपणाचा फुगाच फुटत असतो.

या ढोंगी लोकांमुळेच अंधश्रद्धाविरोधातील प्रबोधनाला खीळ बसते व त्यातून एखाद्या शिक्षिकेने आपल्या कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी आपल्याच लहानग्या विद्यार्थ्याशी लग्न करण्याची घटना घडते. खरंतर देश म्हणून आजच्या विज्ञानयुगात ही लाजिरवाणी बाब ; परंतु एखाद्या लहानग्याला वेठीस धरणे हीसुद्धा धर्मातील अंतर्गत बाब आहे, असं म्हणणारे महाभागही या देशात कमी नाही.

पृथ्वीवरील माणसांवर, त्यांच्या आयुष्यावर ग्रहताऱ्यांचा प्रभाव होतो, असं मानणं यापेक्षा दुसरा मूर्खपणा नसेल. पण भिकारड्या मानसिकतेच्या तथाकथित धर्मपंडितांनी लोकांना भय घालून त्यांची लुबाडणूक करण्यासाठी अशा भाकडकथा तयार केल्या, पसरवल्या व रुजवल्या. या भंपकपणाला देवाधर्माचं कोंदण दिलं. हा खुळचटपणा लोकांच्या मेंदूत इतका घट्ट रुतलाय की तो आनुवंशिकतेने पुढे सरकत विज्ञानयुगातही लोकांच्या मानगुटीवर बसून आहे.

वास्तविक, शिक्षकीपेशात असलेल्या व्यक्तिने विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्यांबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणं अपेक्षित आहे. पण धर्म हा अकलेवरही मात करत असल्याने पंजाबातील जालंधरमधील तथाकथित शिक्षिकाही अंधश्रद्धेला बळी पडली.

धार्मिक अंमलामुळे बेशरमपणा शिक्षकी पेशापेक्षा वरचढ झाला, शिक्षणापेक्षा तंत्रमंत्र आणि ते करणारा भोंदू मांत्रिक प्रभावी ठरला आणि आपल्या कुंडलीतला मंगळदोष करण्यासाठी ती शिक्षिका आपल्याच अवघ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याशी विवाह रचायला तयार झाली.

धार्मिक मूर्खपणाच्या आहारी गेलं की माणसांचं किती अध:पतन होऊ शकतं, याचंच हे बोलकं उदाहरण ! जालंधरमधील बस्ती बावा खेल परिसरातील ही संतापजनक तितकीच लाजीरवाणी घटना !

आपलं षडयंत्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या कुटुंबाची दिशाभूल करत तो अभ्यासात कच्चा असल्याचं सांगत आठवडाभरासाठी आपल्या घरी नेलं ! मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे त्या १३ वर्षीय मुलाशी अगदी धर्मविधी पार पाडत विवाह केला आणि नंतर बांगड्या फोडून स्वत:ला वैधव्य आल्याचं गृहित धरलं.

हळदी, मेहंदी, सुहागरात सगळे सोपस्कार पार पाडण्यात आले. यात शिक्षिकेच्या परिवाराचीही तिला साथ लाभली.

आठवड्याने मुलगा घरी परतल्यावर त्याने सगळी हकीकत आपल्या घरी सांगितली. हादरलेल्या पालकांनी पोलिस ठाणं गाठलं. शिक्षिका व तिच्या कुटुंबाविरोधात मुलाला बंदिवान करून त्याच्या मर्जीविरोधात मानसिक छळ केल्याची तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शिक्षिकेने मुलाच्या कुटुंबावर प्रचंड दबाव आणला. अखेर त्यांच्यात तडजोड होऊन मुलाच्या पालकांनी तक्रार करणं टाळलं.

मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मात्र सदर प्रकार गांभीर्याने घेऊन तपास सुरू ठेवलाय.

 

हेही वाचा :

मोदी सरकारचा स्टीफन हाॅकिंग निघाला तोतया

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!