जेव्हा एक मुस्लिमबहुल गाव अनोळखी मराठी महिलेला त्रेचाळीस वर्षं सांभाळतं…

जेव्हा एक मुस्लिमबहुल गाव अनोळखी मराठी महिलेला त्रेचाळीस वर्षं सांभाळतं…

जेव्हा एक मुस्लिमबहुल गाव अनोळखी मराठी महिलेला त्रेचाळीस वर्षं सांभाळतं…

मध्यप्रदेशातील कोटातला गावातली मुस्लिम बहुल वस्ती एका मनोरुग्ण अनोळखी महिलेला तब्बल त्रेचाळीस वर्ष मायेने सांभाळतं. तिच्याशी मावशीचं नातं जोडतं. प्रथमदर्शनी तरी महिला हिंदू आहे, त्यांना माहित असतं. मराठी असावी असा अंदाज असतो. पण शोध घेऊनही तिचा मूळ ठावठिकाणा सापडत नाही. बघता बघता वर्षांमागून वर्ष उलटतात आणि सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात तिचे धागेदोरे सापडतात. कुटुंबिय तिला न्यायला येतात, तेव्हा मात्र अख्ख्या गावाला रडू कोसळतं ; कारण आता ती कोणी अनोळखी कुठल्या जाती धर्माची व्यक्ति नसते, तर ती असते सगळ्यांची अच्चन मावशी !

हि कहाणी आहे माणुसकीची आणि तितकीच भारतातल्या अनेक वस्त्यांत नांदणाऱ्या हिंदू-मुस्लिम ऐक्याची ! ही घटना द्वेषाचं राजकारण करणा-यांच्या थोबाडावर जोरदार प्रहार करणारी ! हिंदु मुस्लिम विद्वेषाचं राजकारण करून दोन धर्मात फूट पाडणा-या नीच राजकारणाला अशा कृतीशील घटना उत्तर देत असतात. शहर, रस्ते, गल्ली, गांव आजही हेच सांगतात, आम्ही सगळे एक आहोत. आमचं रक्त एक आहे. आमची सुखं एक आहेत, आमची दु:खं एक आहेत.

ही कहाणी सुरू होते, आजपासून ४३ वर्षापूर्वी. महाराष्ट्रातील मानसिकदृष्ट्या आजारी असलेली एक महिला भटकत भटकत ५०० किमीच अंतर पार करून मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड जिल्ह्यातील दमोहपर्यंत पोहचते. अचानक तिच्यावर मधमाश्यांचा हल्ला होतो आणि ती वेदनेने विव्हळत रस्त्याच्या कडेला पडून राहते. तिच्या विव्हळण्याचा आवाज एका ट्रक ड्रायव्हरच्या कानी पडतो. तो ड्रायव्हर आपला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करतो आणि तिच्या चेहऱ्यावरील मधमाश्या बाजूला सारतो आणि पुढच्या प्रवासाला निघून जातो.

काही दिवसांनी नूर खान त्याच रस्त्यांने ट्रक घेऊन जात असताना पुन्हा ती महिला त्यांना तिथेच पडून असल्याचं दिसतं. ते ट्रक बाजूला उभा करून उतरतात आणि त्या महिलेला नाव गांव पत्ता विचारतात ; पण तिला नीट काहीच सांगता येत नाही. तिची ती अवस्था पाहून नूर खानचे अश्रु वाहू लागतात. माणसासारखं माणूस अशा व्याकुळ अवस्थेत जिची मानसिक स्थितीही ठिक नाही. भूक आणि तहानेने व्याकूळ किती दिवस रस्त्यावरच पडून राहिल, असं त्यांना वाटू लागतं. तात्काळ ते त्या महिलेला ट्रकमध्ये बसून आपल्या कोटाताला नामक गावातील घरी घेऊन येतात. आणि रस्त्यावरची ती महिला कोटातला गावची अच्चन मावशी होते. (नुर खान ह्यांनी त्या महिलेला दिलेलं नाव)

मग शोध सुरू होतो अच्चन मावशीच्या परिवाराचा. खूप प्रयत्न करूनही अच्चन मावशी नीट बोलू शकली नाही किंवा तिला आपल्या मूळ गावचे नावही नीट सांगता येत नव्हते. गावात हिंदी आणि उर्दू बोललं जातं. त्यामुळे मावशीलाही काही कळत नव्हतं. अखेर नूर खान त्या महिलेचा सांभाळ करायचं ठरवतात. आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे नूर खान तिचा सांभाळ करु लागतात. कालांतराने नूर खान ह्यांचा मृत्यू होतो आणि अच्चन मावशीची जबाबदारी नूर खान ह्यांचा मुलगा इसरार खान ह्यांच्यावर येते.

तब्बल ४३ वर्ष हा मुस्लिम परिवार त्या महिलेचा सांभाळ करतो. एव्हाना एवढ्या वर्षात ९० वर्षाची अच्चन ही साऱ्या कोटातला गावची मावशी बनते. अच्चन मावशी कधी मध्ये काही मराठी शब्द उच्चारायची, पण तिचे ते संकेत गावातील कोणालाच समजायचे नाहीत.

अच्चन मावशीच्या मुळ परिवाराचा शोध घेता घेता ४ मे २०२० उजाडतं. इसरार खान आपल्या मित्रांसोबत घरी बसले असता, एक मित्र त्यांना सुचवतो. आजीचा जो आवाज आणि संकेत आहे, त्याला रेकॉर्ड करुयात आणि फोटोसहित सोशल मिडियावर व्हायरल करूयात.

आवाज रेकॉर्ड केला जातो आणि अच्चन मावशी एक शब्द उचारते ‘खानजम नगर’ ! बस्स इथून सुरू होतो तंत्रज्ञानाचा प्रवास ! लगेच इसरार खान गुगल सर्च करुन अमरावती जिल्ह्यातील अचलपुर अंतर्गत येणारे खानजम नगर शोधतात आणि गुगलवरुन खानजम नगरमधील अभिषेक नामक व्यक्तीचा नंबर शोधून त्यांच्याशी बोलून अच्चन मावशीचे सगळे तपशिल शेअर करतात आणि त्यांना विनंती करतात की हे सगळे डिटेल्स तुमच्या व्हाट्सएपमार्फत तुमच्या परिसरात शेअर करा.

टाळेबंदीतील काळात इसरार खान आपल्या घरीच असताना अभिषेक यांचा त्यांना कॉल येतो आणि ते आनंदाने उडी मारतात, कारण अभिषेकने मावशीचा मुळ परिवार शोधलेला असतो. मावशीचे खरे नाव पंचूबाई ! नागपूरस्थित पृथ्वी कुमार शिंदे यांच्या त्या आजी !

पृथ्वी कुमार तात्काळ आपल्या आजीला घ्यायला आपल्या पत्नीसह कोटातलाला आपल्या आजीला घ्यायला पोहचतात. तब्बल ४३ वर्ष एक मुस्लिम परिवार हिंदू पंचूबाईचा सांभाळ करत होता. आज पंचूबाईचे पती तेजपाल शिंदे आणि मुलगा भाईलाल दोघेही आपल्या पत्नी आणि आईला पाहण्यासाठी ह्या जगात नाहीत. शिंदे परिवारने बरीच वर्ष पंचूबाईचा शोध घेतला होता, पण ती सापडली नाही आणि आज ४३ वर्षानंतर पंचूबाईला तिचा परिवार सापडला.

आज आपल्या मावशीला निरोप देताना संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू आहेत. आपल्या मावशीसाठी साडेतीनशे कुटुंबाचं दीड हजार लोकसंख्येचे संपूर्ण गाव रडत आहे. इसराल खानला स्वत:ला पंचूबाईचे घर सापडल्याचा आनंद आहे, पण मावशीच्या जाण्याचं प्रचंड दु:ख आहे. पृथ्वी कुमारला मात्र आपली आजी ४३ वर्षानंतर सापडल्याचा आनंद आहे.

अकबर इलाहाबादीच्या एका शेराला जागणारी ही घटना आजच्या काळात महत्वाची आहे-

“मज़हबी बहस मैंने की ही नहीं,
फ़ालतू अक़्ल मुझ में थी ही नहीं “

 

News by Ankush Hambarde Patil

माहिती स्त्रोत : क्विंट हिंदी व इतर अनेक माध्यमं

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!