भारत आणि स्वीडनला जोडणारी एका उपेक्षिताची प्रेमकथा !

भारत आणि स्वीडनला जोडणारी एका उपेक्षिताची प्रेमकथा !

भारत आणि स्वीडनला जोडणारी एका उपेक्षिताची प्रेमकथा !

आयुष्यातील कोणताही प्रवास हा वाटतो तितका सोप्पा नसतो. अनेक अडचणींचा सामना करून यशाला गवसणी घालावी लागते. त्यात भारतासारखा असंख्य जातीत विभागलेल्या देशात जातीय आणि धार्मिक बंधनावरून वाटचाल करावी लागते. अगदी लहान वयापासून जातीय आव्हानांना सामोरे जावं लागतं. हे सगळं सहन करण्यासाठी मानसिकदृष्ट्या प्रचंड सक्षम व्हावं लागतं ; तेव्हा कुठे यशाच्या सर्वोच्च शिखराला गवसणी घालता येते. काहीशी अशीच कहाणी आहे डॉ. पी.के. महानंदिया यांची.

ही एक प्रेरणादायी कहाणी आहेच ; त्याचबरोबर प्रेमासाठी एका प्रियकराने केलेल्या धडपडीचीही कहाणी आहे. Viva Falastin नामक ट्विटर अकाऊंटवरून त्यांची प्रेरणादायी कथा जगासमोर आल्यानंतर अगदी एका दिवसात हजारो लोकांनी हे नाव सर्च केलं. लाखो लोकांनी ही कहाणी आपल्या अकाऊंटवरून शेअर केली.

डॉ.पी के महानंदिया यांचा जन्म ओडिसा राज्यातील अथमलिक जंगली प्रदेशात एका दलित परिवारात झाला. अगदी लहानपणापासूनच जातीयवादाचे चटके त्यांना सहन करावे लागत होते. त्याच्या शाळेतील मुलं त्यांच्या सोबत चांगला व्यवहार करत नव्हते. त्यांना स्पर्श करणे टाळायचे,त्यांच्यापासून लांब बसायचे, त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांपासून लांब बसावं लागायचं. ह्या अशा वातावरणात त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.

१९७१ मध्ये उच्च शिक्षणासाठी त्यांनी दिल्लीच्या कॉलेज अॉफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. कला शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांना केवळ आदिवासी भागातून आलेला असल्यामुळे नोकरी मिळणे कठीण जात होते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस होता, जेव्हा USSR ची महिला अवकाशयात्री वेलेंटीना ट्रसेकोवा यांना भेटण्याची त्यांना संधी मिळाली. ह्या भेटीत त्यांनी वेलेंटीना ट्रसेकोवा यांचं स्वत: काढलेलं एक स्केच भेट दिलं.

त्यांच्या स्केचची चर्चा वर्तमानपत्रातून झळकली आणि पुढे त्यांना भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं स्केच काढण्यासाठीचं निमंत्रण मिळालं.

१७ डिसेंबर १९७५ रोजी स्विडनहून दिल्ली येथे फिरायला आलेल्या स्वीडन राजघराण्यातील चार्लोट वॉन शेड्विन नामक मुलीशी त्यांची ओळख झाली. चार्लोटला आपलं स्केच बनवून घ्यायचे होतं. ह्यातूनच ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. थोड्याच दिवसात दोघांनी लग्नही केलं. लग्नानंतर चार्लोटला विसा मुद्दत संपल्यामुळे स्वीडनला परत जावं लागलं. मधल्या काळात केवळ पत्राद्वारे दोघांत संवाद व्हायचा.

शेवटी महानंदिया यांनीच स्वीडनला जाण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या रस्त्यावर चित्र काढत फिरणा-या महानंदिया यांच्याकडे विमानभाड्याचे पैसे असण्याची शक्यता दुर दुरपर्यंत नव्हती. त्यांच्याजवळ जे काही होतं ते सगळं विकून त्यांनी एक सेकंडहँण्ड सायकल विकत घेतली.

२२ जानेवारी १९७७ ला प्रवास सुरु झाला. सतत पाच महिने सायकलवरून प्रवास करत ते दिल्लीवरुन स्वीडनच्या गोथनबर्ग शहरात आपल्या पत्नीजवळ पोहचले.

त्यांची ही सायकलस्वारी आजही दोन्ही देशांत प्रेमाची असाधारण कहाणी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी हे महानंदिया आणि चार्लोट ह्यांच्या प्रेम कहाणीवर चित्रपट बनवण्यायच्या तयारीत असल्याच्या चर्चाही मधल्या काळात सुरू होत्या.

सध्या ते स्वीडन येथेच स्थायिक असून आपल्या अंगी असलेली चित्रकला ते मुलांना शिकवण्यासाठी वापरत आहेत. त्याच बरोबर ते स्वीडन सरकारच्या कला आणि संस्कृती विभागात सल्लागार म्हणूनही काम पहातात. जागतिक पातळीवरही त्यांच्या कला गुणांची दखल घेतली गेलेली आहे. त्यांच्या चित्रकला प्रदर्शनाला लाखो लोक भेटही देतात.

जानेवारी २०१२ रोजी भूवनेश्वर उडिसा येथील उत्कल कला विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. भारत सरकार आणि स्वीडन मधील कला क्षेत्रातील महत्वाचा दुवा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts
comments

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!