मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
बनावट मजकुरात सांगितलेल्या चार उपचार पद्धती पुढीलप्रमाणे आहेत :
१. क जीवनसत्त्व अर्थात व्हिटॅमिन सी प्राप्त करण्यात कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून तो द्रव थोड्या थोड्या वेळाने प्राशन करणे.
२. सुकं आलं, गूळ आणि तूप यांच्या मिश्रणाच्या गोळ्या दिवसांतून तीन वेळा देणे.
३. गरम दुधात हळद टाकून पिणे कोरोनाप्रतिबंधक आहे.
४. दिवसातून किमान एक वेळ वाफारा घेणे.
या मजकुरात वरील उपचार पद्धती योग्य आहेत का, त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते का, ते कोरोना प्रतिबंधात्मक उपचार आहेत का, हा वादाचा मुद्दा नसून, सदरील उपचार नानावटी रुग्णालयातील कोविड१९ तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचवलेले आहेत का, हा कळीचा मुद्दा आहे.
कोणी का सुचवेना, उपचार नुकसानदायक तर नाहीयेत ना, अशी वेळ मारून नेण्याची लोकांची सर्वसाधारण प्रवृत्ती असल्याने असे मजकूर कोणाच्याही नावावर सहज खपवले जातात. लोक नावं वाचून डोळे झाकून विश्वास ठेवतात, जे घातकही ठरू शकतं. कारण सगळ्याच उपचारपद्धती सगळ्याच रुग्णांवर प्रभावी ठरतील, यांची शाश्वती नसते.
रुग्णनिहाय पथ्यपाणी वेगवेगळं असू शकतं. म्हणूनच अशा मजकुराची खातरजमा करणं गरजेचं व सार्वजनिक हिताचं ठरतं.
व्हिटॅमिन सी व अन्य घटक कोणत्याही आजारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास पूरक ठरतात, हे खरं असलं तरीही सदर मजकुरात नमूद उपचार पद्धती आमच्या डाॅक्टरांनी कोरोनावरील उपाय म्हणून सुचविलेली नाही, असा स्पष्ट खुलासा नानावटी रुग्णालयाने केला आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी आपल्या डाॅक्टरांशी सल्लामसलत करावी, असं आवाहनही नानावटी रुग्णालयाने केलं आहे.
While Vitamin C and others help boost immunity against any infection or illness, these are not recommended treatments by our doctors for Corona Virus patients. Please follow any treatment protocols only after consulting your doctor.
— Nanavati Hospital (@Nanavati_H) May 19, 2020
केवळ नानावटी रुग्णालयच नव्हे, तर अशा प्रकारची उपचारपद्धती कोविड१९ रुग्णांबाबतीत राबवली जात असल्याची पुष्टी इतरही कोणत्या रुग्णालयातून मिळत नाही.
नानावटी रुग्णालयातून एक कोरोनाबाधित महिला बरी होऊन घरी परतल्याची बातमी वृत्तवाहिनीवर झळकली होती. शिवाय, डॉ. अब्दुल अन्सारी कोरोनासंदर्भात काही वृत्तवाहिन्यांवर बोलताना दिसतात. त्याचाच गैरफायदा बनावट मजकूर पसरवण्यासाठी खोडसाळ व्यक्तिंनी घेतला असावा, अशी शक्यताही असू शकते.
समाजमाध्यमात पसरवल्या जाणाऱ्या मजकुरासोबत कोणाही नामांकित व्यक्तिंची नावं बिनधास्त जोडली जातात. गडबड कुठे होते की समाजातील शिक्षित म्हणवणारा वर्गही असे मजकूर कसलीही खातरजमा न करता डोळे झाकून पुढे पाठवत असतो. त्यांच्यामुळे समाजातील इतर लोक बळी पडतात. पण नानावटी रुग्णालयाच्या खुलाश्यामुळे समाज जीवघेण्या आजारांतही किती बेजबाबदारपणे वागत असतो, याची पुन्हा एकदा प्रचिती मिळते.
Asmita Abhyankar
Nice