अत्याचाराविरोधात लढणाऱ्यांना आजही देशद्रोही ठरवलं जातंय ! : खासदार संजय राऊत

अत्याचाराविरोधात लढणाऱ्यांना आजही देशद्रोही ठरवलं जातंय ! : खासदार संजय राऊत

अत्याचाराविरोधात लढणाऱ्यांना आजही देशद्रोही ठरवलं जातंय ! : खासदार संजय राऊत

जंगलातला अत्याचार आणि कायद्याची बेबंदशाही रोखणारे 'चंद्र'सारखे आजही कुणी उभे राहतात, तेव्हा त्यांना देशद्रोही, वामपंथी, राज्य उलथविण्याचा कट रचणारे ठरवून पोलिसी शिकार व्हावं लागतं, असं मत मांडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मानवाधिकार कार्यकर्त्यांची बाजू सामना तील रोखठोकमध्ये उचलून धरली आहे.

जय भीम चित्रपटाचं समीक्षण करताना संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

मुंबईच्या तुरुंगात फादर स्टॅन स्वामी वयाच्या ८४व्या वर्षी मरण पावले. झारखंडच्या जंगलातील आदिवासी, वेठबिगारांच्या हक्कांसाठी ते लढत राहिले म्हणून राज्यसत्ता उलथवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवून या विकलांग म्हातान्याला आपण तुरुंगातच ठार मारले, असा उल्लेख खासदार राऊत यांनी केलाय.

छत्तीसगडमध्ये आदिवासींच्या मानवाधिकारासाठी लढणारे प्रा. सुधा भारद्वाज, कवी वरवरा राव हे सगळे मजूर वर्गाच्या हक्कांसाठी लढत राहिले. कारण अनेक राजकन्नू त्यांच्या सभोवती होते. त्यांचा आवाज, त्यांचे हक्क चिरडले गेले तेव्हा स्वामी, सुधा, वरवरा रावसारखे 'चंद्र' लढत राहिले. त्या सगळ्या लढवय्यांची कहाणी म्हणजे 'जय भीम'! अशी मांडणी करत खासदार राऊत म्हणतात की चंद्रू जिंकला, पण सुधा भारद्वाज, वरवरा राव स्वतंत्र हिंदुस्थानच्या तुरुंगात सडत पडले आहेत !

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!