मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मीरा आणि सुनीता…अर्जूनी मोरगावच्या उपजिल्हाधिकारी शिल्पा सोनालेंकडे स्वयंपाक व इतर काम करतात…शिल्पा यांचं कुटुंब त्यांना मुलीच समजतं…आणि अर्थातच, त्या पण आमच्या घराला आपलं माहेर समजतात..मॅडमच्या आईवडिलांना आई-बाबाच म्हणतात..या खऱ्या घरच्या लक्ष्मी.. म्हणून लक्ष्मीपुजनादिवशी त्यांचंच पुजन शिल्पा सोनाले यांनी केलं !
शिल्पा घरी नसल्या तरी घरातलं काम, टापटीप ठेवणं, आईवडिल बाहेर किंवा उल्हासनगरला आपल्या घरी असताना बागेला पाणी देणं, बागेची देखभाल करणं हे सगळं त्याच पाहतात…सगळंच मनापासून करतात..अगदी आठ दिवसानंतर ही गेलं तरी ही घर अगदी स्वच्छंच दिसणार..आपल्या कामाशी त्या दोघी अगदी प्रामाणिक आहेत. गेल्या पाच वर्षापासून दोघी घरात काम करताहेत. अगदी स्वतःचं घर म्हणून त्या सांभाळत आहेत…!
दिवाळीला मीराच्या मुलीने तनिष्काने स्वतःहून अंगणात खूप सुंदर रांगोळी काढली. सुनीताही छान रांगोळ्या काढते..हॅपी दिवाळी ची रांगोळी सुनीताचीच..
स्वयंपाक करताना गाणी म्हणणं ही दोघांचीही आवड. शिल्पा, अजिता किंवा शिल्पा यांचे वडिल कमलेश सोनाले कोणीही असलं तरी त्यांचा गळा गाता असतो…इतरांच्या समोर मात्र त्या चूप होतात. पण बडबड्या आहेत दोघीही !
शिल्पा यांच्या आई व ‘पडद्यामागचं गाणं’ या पुस्तकाच्या लेखिका अजिता सोनाले यांच्याकडून वेगवेगळे पदार्थ, स्वयंपाक अगदी आवडीने शिकणं, करून दाखवणं…दोघींनाही आवडतं. दोघी स्वयंपाकही छान करतात. आई आई म्हणताना थकत नाहीत…खूपच गोड पोरी आहेत, असं अजिता सोनाले यांनी ‘मिडिया भारत न्यूज’ला सांगितलं.
तीन वर्षांपासून शिल्पा अर्जूनी मोरगावला असते.
मधून मधून तुमसरला येत असते. काही वेळेस तर तिला रविवारी सुद्धा येता येत नाही. शिल्पा इकडे आली की या दोघींमुळे शिल्पाच्या जेवणाच्या बाबतीत तरी मी चिंतामुक्त असते..असं अजिता सांगतात.