अर्जाचा नमुना देशभर एकसारखा हवा !

अर्जाचा नमुना देशभर एकसारखा हवा !

अर्जाचा नमुना देशभर एकसारखा हवा !

आपल्या विविध कामांसाठी विविध अर्ज भरावे लागतात. त्यात आपण आपलं नाव, पत्ता व इतर वैयक्तिक माहिती भरत असतो. मात्र या अर्जाचा सामाईक नमुना नाही.

खरं तर एकदा आधारची पद्धत लागू झाल्यानंतर प्रत्येकवेळी नवनवे अर्ज भरण्याची झंझट असताच कामा नये. फक्त आधार नंबर भरला की इतर माहिती आपोआप स्वयंचलित पद्धतीने भरली गेली पाहिजे. पण अजूनही आधार सगळ्या राज्यांना शासकीय विभागांना जोडलं गेलेलं दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी नव्याने अर्ज भरावा लागतो. कधी आॅनलाईन तर कधी आॅफलाईन !

पण या अर्जांमध्ये कधी पहिलं नाव आधी लिहायचं असतं तर कधी आडनावाचा रकाना सुरूवातीला ठेवलेला असतो. जिथे आडनाव आधी असतं, तिथे नंतर आपलं नाव आणि त्यानंतर वडिलांचं नाव ! यात अनेकांचा गोंधळ उडतो. वडिलांचं नाव मध्ये की शेवटी ? यात अनेकांना संभ्रम असतो. आता तर आईचं नावही मध्ये जोडलं गेलंय. त्यापेक्षा आधी पहिलं नाव आणि मग आडनाव अशी सरळमार्गी रचना हवी. आई आणि वडिलांच्या नावाचे स्वतंत्र रकाने असावेत.

पत्त्याच्या बाबतीतही तेच. जे जे रकाने ठेवले जातात, तशी प्रत्यक्ष सोय शासनानेही केलेली नसते. उदा. मोहल्ला, रस्ता, विभाग, नगर, शहर वगैरे. वर्षेनुवर्षे लोकांना पत्ता उलटसुलट सांगण्याची सवय पडून गेलीय. तसे रकाने नसतात. मग गोंधळ उडतो. तीच गत जन्मतारखेची.

तर, देशपातळीवर एकच एक सामाईक नमुना असावा. तो भले राज्यांनी प्रादेशिक भाषांत आणावा. पण इकडे एक आणि तिकडे एक असा गोंधळ नको. कुठलाही दाखला, पासपोर्ट सारखे महत्त्वाचे दस्तावेज जारी करण्यापूर्वी ते अर्जदारांना दाखवून आवश्यक दुरूस्ती करून मगच सहीशिक्क्यानिशी जारी व्हावेत. जेणेकरून नंतरचा मनस्ताप टळेल.

 

धीरेंद्रकुमार मिश्रा

सुश्रुषा, वडाळा पूर्व, मुंबई – ४०००३७

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!