कोरोनाचं औषध म्हणून दारू पाजायचा आणि लैंगिक शोषण करायचा साधू !

कोरोनाचं औषध म्हणून दारू पाजायचा आणि लैंगिक शोषण करायचा साधू !

कोरोनाचं औषध म्हणून दारू पाजायचा आणि लैंगिक शोषण करायचा साधू !

धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली सुरू होते चाळे !

” मॕडम आम्हाला कोरानावरील औषध म्हणून आश्रमात दारु पाजत आहेत ! आम्ही नकार दिल्यामुळे आम्हाला भरपूर मार खावा लागला,आमचे गुरुजी आमच्या सोबत खूप काही घाण काम करत आहेत ! आम्ही धार्मिक शिक्षण घेण्यासाठी आलोय, पण इथे आमच लैंगिक शोषण होत आहे. आम्हाला ह्यातून बाहेर काढा “

ही कहाणी एका दहा वर्षीय मुलाने बालकल्याण समितीला फोनवरून ऐकवली. मुलगा मिजोराममधील आहे, तर धर्माच्या आडून भोंदूगिरी करणारा साधू उत्तरप्रदेशातील आहे.

उत्तरप्रदेशातील मुज्जफरनगरपासून २५ किलोमिटर दूर भोपा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या तिर्थनगरी शुक्रतालमधील गौडीय आश्रम मठाचा संचालक भक्तीभूषण महाराज याला पोलिसांनी अटक केली आहे.

हे गाववाल्यांचं आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र असून त्यांना आपल्या आश्रमाची जमीन हडप करायची आहे, असं आता भोंदू साधू पोलिसांना सांगतो आहे. पण मुलांच्या वैद्यकीय तपासणीत साधूची कृष्णकृत्यं उघड झालीय.

भोपा स्टेशन प्रभारी संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाने केलेल्या तक्रारीवरून त्यांनी ही कार्यवाही केलेली आहे. चाईल्ड केअर कमिटीच्या मदतीने भक्ती भूषण आणि त्याचा सहकारी कृष्ण मोहन दास यांना अटक केली आहे. लहान मुलांचे लैगिंक शोषण तसेच त्यांना कोरोना औषधाच्या नावाखाली दारु पाजणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

भक्तीभूषण महाराज यांच्यावर कलम ३७७, कलम ३२३, कलम ५०४ नुसार शिवाय पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सद्या साधू न्यायालयीन कोठडीत आहे.

भक्तीभूषण नावाचा हा तथाकथित साधू मूळचा उत्तरप्रदेशातीलच सिसौलीतला आहे. लोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेत त्याने चमत्कारी बाबा म्हणून बस्तान बसवलं आणि रग्गड पैसा कमावला. त्यातूनच त्याने मठ बांधला. धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली तो मुलांना मठात ठेवून घेत असे.

प्रत्यक्षात त्यांच्याकडून मजुरीचं काम करून घे, मारझोड कर, दारू पाजून लैंगिक शोषण असले प्रकार सुरू होते. पोलिसांनी आश्रमातून सुटका केलेल्या १० पैकी ४ मुलांवर लैगिंक अत्याचार झाल्याचे मेडिकल रिपोर्ट मधून स्पष्ट झालं आहे.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!