चुरूचा विक्रमी उष्मा ; तितकाच विक्रमी गारठा ! आजपासून उबदारपणाची सुरुवात !

चुरूचा विक्रमी उष्मा ; तितकाच विक्रमी गारठा !  आजपासून उबदारपणाची सुरुवात !

चुरूचा विक्रमी उष्मा ; तितकाच विक्रमी गारठा ! आजपासून उबदारपणाची सुरुवात !

आज डिसेंबर २०२० मध्येही चुरु आपल्या भौगोलिक तापमानामुळे पून्हा एकदा चर्चेत आलं आहे. मागील शुक्रवारी चुरुमध्ये देशातील सर्वोच्च थंडीची नोंद झाली आहे. तापमान सबझीरोच्या स्थितीमध्ये पोहचले. उणे ०.३ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेतली गेलीय.

मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात सोशल मिडियावर एका वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ होता राजस्थान मधील चुरु जिल्ह्यातला ! त्यावेळी राजस्थानमधील चुरु जिल्ह्यात सर्वाधिक 50.8 डिग्री सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती.

सदर व्हिडिओत स्थानिक सहाय्यक प्राध्यापक डॉ. हेमंत मंगल यांनी पत्रकाराला चुरुच्या रेगिस्थानात कच्चे पापड आणि अंड्यावरचा एक प्रयोग करुन दाखवला होता.

अंडे आणि पापड उन्हाच्या साह्याने भाजून दाखवले होते. चुरुतील तापमान सामान्य माणसाला कळावे, हा त्यामागचा हेतू होता.

आज डिसेंबर २०२० मध्येही चुरु आपल्या भौगोलिक तापमानामुळे पून्हा एकदा चर्चेत आलं आहे. मागील शुक्रवारी चुरुमध्ये देशातील सर्वोच्च थंडीची नोंद झाली आहे. तापमान सबझीरोच्या स्थितीमध्ये पोहचले. उणे ०.३ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेतली गेलीय.

भारतात सर्वाधिक गर्मी आणि सर्वाधिक थंडी एकाच भूभागावर नोंदवली गेलीय. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येथील तापमान 33.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, तोही एक विक्रमच होता ; कारण मागील १७ वर्षातील डिसेंबरमधील हे सर्वोच्च तापमान होतं आणि दुसऱ्याच आठवड्यात तापमान कमी कमी होत २.२ डिग्रीपर्यंत आलं.

चुरुमधील गर्मी आणि थंडीमागचं प्रमुख कारण चुरुचं भौगोलिक स्थान आहे.

राजस्थानच्या वाळवंटातला सर्वात पूर्वेकडे असलेला हा जिल्हा आहे. पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या हवेमुळे येथील वाळवंटातील वाळूचे कण आणि माती मोठ्या प्रमाणात हवेत पसरतात आणि थंडीच्या दिवसात ते वातावरणातच एकत्र स्वत:चं आच्छादन निर्माण करतात.

सुर्यापासून निघणारे उष्ण किरण या आच्छादनाने अडल्यामुळे जमिनीपर्यंत आपल्या पूर्ण उर्जेनिशी पोहचत नाहीत ; त्यामुळे जमिनीवरील वातावरण पूर्णतः गार असतं.

याच बरोबर हा जिल्हा जम्मूकाश्मीरच्या दक्षिणेला असल्याकारणाने काश्मीरात होणाऱ्या बर्फवृष्टिचाही थेट परिणाम येथे होतो. यातून हवेतील शुष्कता वाढली जाते आणि जमिनीतील उष्णता रोखून ठेवण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. त्यातून येथील तापमान थंडीच्या दिवसात विक्रमी न्यूनतम असतं.

वातावरणातील हा गारठा २० डिसेंबरपर्यंत म्हणजे आज रोजी पर्यंत कायम राहील. नंतर हळूहळू उष्णता वाढत जाईल, असा अंदाज स्थानिक हवामान खात्याचा अंदाज आहे.

MediaBharatNews

Related Posts
comments

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!