गच्चीवर एकटंपण जाणवत नाही !

निवांतपणा म्हटला की घराची गच्ची आठवल्याशिवाय राहत नाही. थकवा, शिणवटा घालवण्यासाठी गच्चीखेरीज दुसरी खास आणि सुंदर जागाच नाही. विविध फुलझाडांनी आणि उपयुक्त झाडांनी बहरलेली ही गच्ची कधी आपल्याशी मनमोकळी बोलू लागते ते आपलेच आपल्याला कळत नाही. आणि मग सुरू होतं ते गच्ची आणि आपल्यातील सुंदर नातं..!

छान, सुंदर क्षणांची साक्षीदार होते ती गच्ची. मैत्रिणीबरोबर मारलेल्या मनमोकळ्या गप्पा असू देत किंवा घरच्यांबरोबर केलेला दिलखुलास संवाद असू देत. गच्चीवरच्या गप्पा ह्या मनाला खूप तजेला देतात.

सोबत फुलझाडांचा ताटवा अधिकच आनंद देऊन जातो. कधी- कधी थंडीच्या दिवसात कोवळ्या उन्हात वाफाळलेला चहा घेत घेत आकाशाच केलेलं निरीक्षण मन मोहवून टाकतं. गच्चीवर माणसाला एकटेपण जाणवत नाही.

दुपारच्या वेळेस कधी कधी वाळवण लावण्यातसुद्धा एक मज्जा असते. बर्‍याच जणी मदतीला असतात. वाळवणाचे काम कधी संपते ते कळत सुद्धा नाही. किती महत्वाची गच्ची? नाही का?

वाळवण पाहण्यासाठी तर कधी ती चाखण्यासाठी पाखरांनी केलेली गर्दी ही फक्त गच्चीवरच पाहू शकतो. शांत उभं राहून गच्चीवरून पाहिलेला सूर्यास्त, जणू काही आपल्याला खुणावत असतो…मी उद्या पुन्हा येईन हा!

गच्चीवरुन दिसणारी घराकडे निघालेली पाखरे, रस्त्यावरुन जो- तो आपल्या घराच्या मार्गाने निघालेला दिसतो. गच्चीवरुन ते दृश्य अगदी छोटं छोटं दिसत असतं. बराच दूरवरचा प्रदेश दिसत राहतो.

वर निरभ्र आकाश आणि खाली छोटी छोटी घरे, छोटी छोटी माणसे दिसतात. फार गंमत वाटते या सर्वांचं निरीक्षण करताना.

प्रत्येक स्त्रीची “स्वयंपाकघरा नंतर आणखीन कोणती आवडीची जागा असेल तर ती म्हणजे गच्ची”. म्हणूनच “माझी गच्ची माझा निवांतपणा”! हे समीकरण जुळलंय.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

comments
  • खरंच आहे … त्यात आणखीन सुंदरशी बंगई असेल तर aaha kya bat हे…masta ch 👍👌👌

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!