मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
लडाखच्या गालवान खोऱ्यात झालेल्या चकमकीच्या तीन दिवसानंतर २० भारतीय सैनिक मरण पावले, चिनींनी गुरुवारी सायंकाळी भारतीय लष्कराच्या दहा जवानांना ताब्यात घेतले, ज्यात एक लेफ्टनंट कर्नल आणि तीन मेजर होते. द
हिंदूच्या एका बातमी नुसार सर्व १० जणांना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आले. बुधवारी संध्याकाळी मेजर जनरल-स्तरीय चर्चेत करार झाल्यानंतर त्यांना परत भारताकडे सोपवण्यात आले. पण भारताने हा दावा फेटाळून लावला.
लष्कराने एका निवेदनात स्पष्ट केलंय की “कारवाईत कोणतेही भारतीय सैन्य चीनच्या ताब्यात गेलेच नाहीत”
भारतीय सैन्यांच्या म्हणण्यानुसार १५-१६ जून च्या रात्री भारतीय सैनिकांना चीनी सैनिकांनी खिळे असलेल्या रॉडनी मारहाण केली आणि याच दरम्यान एक बातमी बाहेर आली की त्यावेळी भारतीय सैन्य सशस्त्र नव्हते त्यांच्याकडे कोणतेही हत्यार नव्हते हाच मुद्दा पकडून काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरलं.
राहुल गांधींनी सवाल केलाय, “भारतीय सैनिकांना निशस्त्र चीनच्या सैनिकांना कोणी सोपवलं” ?
राहुल गांधीना उत्तर देताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर म्हणतात,
भारतीय सैनिक निशस्त्र नव्हते, पण चीनशी झालेल्या १९९६ आणि २००५ च्या संधी अटीमुळे त्यांनी त्यावेळी हत्याराचा वापर केला नाही.
१९ नोव्हेबर १९९६ ला भारत आणि चीन दरम्यान एक सीमा करार झाला होता त्या करारानुसार,
दोन्ही सैन्यदल एकमेंकाविरोधात हत्याराचा वापर करणार नाही. आपलं वर्चस्व सिध्द करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही, तसेच श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचाही प्रयत्न करणार नाहीत
संधी अनुच्छेद सहा नुसार सीमेवर दोन किलोमीटरच्या अंतरावर असताना दोन्ही सैन्य एकमेकांवर गोळीबार करणार नाहीत तसेच केमिकल बॉम्ब चा वापर करणार नाहीत.
२००५ मध्ये ह्याच करारात नविन गोष्टीची भर घातली भारत आणि चीन आपले सीमाप्रश्न शांततेच्या मार्गाने चर्चेच्या माध्यमातून सोडवतील
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितलं की आम्ही कराराच्या सर्व नियम आणि अटींच पालन केलं आहे. कोणत्याही शस्त्र संधीचं भारताने उल्लंघन केलेले नाही.
News by Ankush Hambarde Patil