युपी मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं ! ऑस्ट्रेलियन खासदाराकडून कौतुक !! पण तथ्य काय ?

युपी मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं ! ऑस्ट्रेलियन खासदाराकडून कौतुक !! पण तथ्य काय ?

युपी मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं ! ऑस्ट्रेलियन खासदाराकडून कौतुक !! पण तथ्य काय ?

ऑस्ट्रेलियन खासदार क्रेग केल्ली यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय मोहन बिष्ट यांचं कौतुक केलं आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात, जिथली लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के इतकी आहे, त्या राज्यात कोविडमृत्यूंचं प्रमाण अडीच टक्क्यांवर तसंच कोविडबाधितांचं प्रमाण एक टक्क्यावर आणल्याबद्दल क्रेग केल्ली यांनी युपी मुख्यमंत्र्यांची नुसतीच दखल घेतलेली नाही तर ऑस्ट्रेलियाने त्यांना आपल्याकडे मागवून घ्यावं, असं सुद्धा नमूद केलं आहे.

त्यावर हरखून जाऊन यूपी सरकारने क्रेग केल्ली यांना यूपीत येण्याचं आमंत्रण दिलं आहे. भारतीय माध्यमांनीही अजय मोहन यांची ही तथाकथित सफलता स्वाभाविकता उचलून धरली आहे.

क्रेग केल्ली हे ऑस्ट्रेलियातील वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. कोरोनाव्हायरस कोविड आजार, त्यावरचे उपचार, लसीकरण याबाबतीत सतत दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. फेसबुकने याच कारणासाठी त्यांचं पेज कायमचं काढून टाकलं आहे.

क्रेग केल्ली यांनी उत्तर प्रदेशाच्या केलेल्या कौतुकाला माहिती विश्लेषक जे शॅमी यांच्या ट्वीटचा आधार आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांची तुलना केली आहे. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात अधिक तपासण्या होतात, त्यामुळे महाराष्ट्राचा आकडा मोठा दिसतो, हा दावा जे शॅमी यांनी खोडून काढला आहे.

क्रेग केल्ली यांनी उत्तरप्रदेशचं कौतुक करताना कोविडवरील आयव्हरमेक्टीन या औषधाचा उल्लेख केला आहे.

लसीकरण्यापेक्षा क्रेग केल्ली यांचा आयव्हरमेक्टीनवर अधिक विश्वास आहे. ते या उपचार पद्धतीचे पुरस्कर्ते आहेत. उत्तर प्रदेशात याच उपचारांचा अवलंब केला गेला असल्याचं क्रेग केल्ली यांच्या ट्वीटमधून स्पष्ट होतं.

आश्चर्यकारक हे की जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टीनच्या उपचारांना मान्यता दिलेली नाही.
https://www.who.int/news-room/feature-stories/detail/who-advises-that-ivermectin-only-be-used-to-treat-covid-19-within-clinical-trials

इंडियन एक्स्प्रेसच्या ७ जून २०२१ च्या एका वृत्तानुसार, भारताच्या आरोग्य सेवा महासंचालकांनी जारी केलेल्या कोविड प्रतिबंधक उपचारांच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही या उपचारांचा समावेश नाही.
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/coronavirus-outbreak/story/revised-health-ministry-guidelines-stop-usage-of-ivermectin-doxycycline-in-covid-treatment-1811809-2021-06-07

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने आयव्हरमेक्टीनबाबत गंभीर इशारे दिले आहेत. या औषधाच्या अतिसेवनामुळे मळमळ, उलट्या, अतिसार, हायपोटेन्शन (कमी रक्तदाब), ॲलर्जी (खाज आणि पोळ्या), चक्कर येणे, अटॅक्सीका (संतुलनाच्या समस्या), झटके, कोमा आणि अगदी मृत्यू देखील होऊ शकतात, असं नमूद करून प्रशासन म्हणतं की

जनावरासाठी असलेलं औषध माणसांना देणं योग्य नाही. ज्या औषधाचे वैज्ञानिक सुपरिणाम संशोधनाने अद्याप निश्चित केलेले नाहीत, ते औषध घेणं घातक आहे.

https://www.fda.gov/consumers/consumer-updates/why-you-should-not-use-ivermectin-treat-or-prevent-covid-19

तरीही, भारतात गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेशसारखी राज्ये आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करत लोकांच्या जीवाशी खेळताहेत. ऑस्ट्रेलियन सरकारवरील रागातून क्रेग केल्ली सारखे उथळ राजकारणी उत्तरप्रदेशासारखं उदाहरण उचलून धरतात. त्याला कागदावरच्या आकडेवारीशिवाय इतर कसलाही वैज्ञानिक किंवा ठोस आधार नसतो.

क्रेग केल्ली यांच्या ट्वीटखाली त्यांना अनेकांनी उत्तरप्रदेशातील गंगेत फेकल्या गेलेल्या हजारों प्रेतांचा संदर्भ दिलाय.

कोविड प्रतिबंधक उपचारांबाबत सातत्याने चुकीची माहिती पसरवत असल्याबाबत ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री स्काॅट माॅरीसन यांनी वारंवार क्रेग केल्ली यांना तंबी दिलीय. फेसबुकने त्यांचं पेज काढून टाकलंय. आता प्रश्न असा निर्माण होतो की क्रेग केल्ली यांनी हिंदुत्ववाद्यांना उत्साहित होण्यास कारण ठरलेली, उत्तरप्रदेशच्या सफलतेची जी दखल घेतलीय ती तथ्यावर आधारित समजावी की क्रेग यांच्या सवयीप्रमाणे दिशाभूल ?

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मिडिया भारत न्यूज

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!