" धर्मराज ..! धर्मराज .. सुनो धर्मराज मैने सुना है~~ तुम मुझसे मिलना चाहते थे .. तुम्हे मेरीं कविताएँ अच्छीं लगतीं थीं .. तुम अच्छे हो जाओ जल्दी से … और अपने भाई के साथ आ जाओ मिलने .. मैं तुमसे केहेता हूँ तुम्हारी पसंद का कोई भी गाना सुना दुँगा मैं .. जो~~ तुम्हें पसंद था .. धर्मराज… आँखें खोलो धर्मराज और सुनो~~....जब आओगे ना तो नईं कविताएँ भी सुनाऊँगा… बस जल्दीसे अच्छे हो जाओ धर्मराज .. मेरी आवाज़ सुन रहे हो ना धर्मराज .. “
हा आवाज असतो प्रसिद्ध शायर गीतकार गुलजार यांचा आणि ते बोलत असतात धर्मराज पाटील या एका अनोळखी रसिकाशी ! ज्याला त्यांनी कधीच पाहिलेलं नसतं, कधी ऐकलेलंही नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलजार बोलत असतात, तेव्हा धर्मराज एका रुग्णालयात मृत्यूंशी झुंजत असलेला कोमात गेलेला एक रुग्ण असतो. त्या अवस्थेतही गुलजारांचा आवाज ऐकून त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात; तो एक दीर्घ श्वास घेतो.
नामवंत कवी व अभिनेता किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी धर्मराजची आठवण काढणारी पोस्ट फेसबुकवर केलीय.

धर्मराज पाटील. वय वर्ष अवघं चाळीस. मी याला ओळखत नव्हतो. जो गेल्या एक मार्चलाच निघून गेलाय या जगातून. तो रानावनात फिरायचा .. पक्षांशी बोलायचा .. एक नामवंत पक्षीतज्ञ होता तो.. त्याची या विषयात पीएचडी होती. उद्या, म्हणजे एकवीस मार्चला त्याचा वाढदिवस आणि एकवीस मार्च म्हणजे 'वनदिन'. फॉरेस्ट डे. किशोर कदम यांच्या पोस्टमध्ये इथून धर्मराज आपल्याला भेटतो आणि पुढे अस्वस्थ करत राहतो, जसा तो किशोर कदम यांनाही अस्वस्थ करत होता.
गेल्या वर्षी २३ फेब्रुवारीला अमित भंडारी या मित्राने किशोर कदम यांना एका मुलीच्या असहाय रडवेल्या आवाजातली क्लिप पाठवली होती, ज्यात ती धर्मराजबद्दल सांगत होती. धर्मराज अविवाहित ! घरी एकटाच असताना त्याचा ब्रेन हॅमरेज झाला. १४ तास तो तसाच पडून होता. रुग्णालयात आणलंय. पण कोमात गेलाय. महिन्याभरापूर्वी त्याने गुलजारांना भेटण्याची अतीव इच्छा व्यक्त केली होती. गुलजारांना भेटणं त्याच्या आयुष्यातील एक जणू महत्वाकांक्षा होती. असं ती मुलगी ( रुपाली ) क्लीपमध्ये सांगत होती.
रुपालीची इच्छा होती की जर गुलजारांचा आवाज धर्मराजच्या कानावर पडला, त्यांच्या आवाजातली त्याच्याशी बोलणारी क्लीप जरी पुन्हा पुन्हा ऐकवली तर कदाचित तो कोमातून बाहेर येण्याची धडपड करेल. वाचू शकेल !
क्लीप ऐकून किशोर कदम सुन्न झाले. रात्रीचे पावणे दहा वाजलेले होते. त्यावेळी ते "गोंधळ " नावाच्या चित्रपटाच्या शूटसाठी राजगुरूनगरमधल्या व्हिट्स कामत ह्या हायवे लगतच्या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरल्या ३०१ नंबरच्या रूममध्ये होते. खूप वेळ नुस्तं हायवेवरलं ट्राफिक पाहत खिडकीशी उभं असतानाच गुलज़ार साहेबांच्याच ओळी अचानक त्यांना आठवू लागतात ..
"वक्त को आते ना जाते ना गुज़रते देखा
ना उतरते हुए देखा कभी इलहाम की सुरत
जमा होते हुए एक जगह मगर देखा है....
शेवटी न राहून किशोर यांनी गुलज़ार साहेबांना फोन लावलाच. .. रिंग वाजत राहिली पण त्यांनी फोन उचलला नाही. गुलजार दहालाच झोपतात, हे किशोर यांना माहित होतं. पण ते अस्वस्थ असतात. एक अनोळखी धर्मराज गुलजार साहेबांच्या आवाजाने जगू शकतो, ही असह्य बैचेनी त्यांना छळत असते. पुन्हा धडपडावं, पण रात्रीचे बारा वाजत आलेत म्हणून फोन करायला मन धजावत नाही. रात्र सतावत राहते. पहाटे कधीतरी जाग येते. हळुहळू उजाडतं. सकाळचे साडेआठ होतात. इतक्या सकाळी फोन करावा या विचारात शूटींगला जायची वेळ होते.

जवळजवळ साडे सत्तेचाळीस किलोमीटरवरचं वळद गाव. शूटींगची लगबग सुरू असते. पण किशोर कदमांच्या डोक्यातून धर्मराज जायला तयार नसतो. दहा वाजण्याची ते वाट पाहत असतात. सीन विनोदी असतो. त्या अवस्थेत येण्याची धडपड सुरू असते आणि लक्ष सगळं घड्याळाकडे असतं. दहा वाजायला काही वेळ असतानाच किशोर शूटींग अचानक थांबवतात आणि गुलजार यांना फोन लावतात. बोलणं होतं. विषय पोचतो आणि गुलजारही 'करते है' म्हणत तयार होतात.
दरम्यान, धर्मराजच्या आवाजातली कधीतरी रेकाॅर्ड केलेली एक क्लीप रुपालीकडून किशोरना येते...
" काफी वक्त़ बीता गुलजाऱ
तुम्हारा इंतज़ार करते करते
शायद चंद सदीयॉं बीती हों
मैं वहीं बैठा हूँ उस मोडपर
जहाँ तुम्हारे छाँव की उँगली
पहली बार थामी थीं मैंने
सोचा के तुम आओगे कभी
ख़ुद की छाँव कि तलाश मे
जिस पेड़ के नीचे मै बैठा रहा
उसकी सारीं पत्तीयॉं अब
सुख़कर गिर चुकी हैं गुलज़ार
हजारों बारिशें आकर चली गईं
लाखों मुसाफ़िर गुज़रे यहॉं से
फिर भी एक पत्ता नया न आया
इस पेड की शांख आज भी
उसी तरह कॉंप उठती है गुलजा़र
समझा बुझाकर सुला देता हूँ
आओ कूछ बातें कर लें
नज़्म के छाले देखें दिखॉंए
कब तक मैं अपनी छाँव
घूमता रहूँगा ऐसे
जगाओ मुझे यहॉं से
जहॉं इंतजा़र भी पिघलने को है
काफी वक्त बीता गुलजार
तिकडे सुगंधा नावाच्या त्या वेळी हॉस्पिटलमध्ये धर्मराजजवळ असलेल्या मैत्रिणीने गुलजा़र साहेबांशी बोलून…तिचा फोन धर्मराजच्या कानाशी नेऊन गुलजारांचा आवाज त्याला ऐकवला. फोन धर्मराजच्या कानाशी असतांनाच त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळल्याचं ...त्याने एक दीर्घ श्वास घेतल्याचं रुपालीने किशोरना सांगितलं.
गुलजार यांचा रेकाॅर्ड झालेल्या आवाजाची क्लीप रुपालीकडून किशोर कदमांकडे येते. शूटींग थांबवून आख्खं युनिट तो आवाज ऐकतं.
गुलज़ार साहेब बोलत असतात..

" धर्मराज ..! धर्मराज .. सुनो धर्मराज मैने सुना है~~ तुम मुझसे मिलना चाहते थे .. तुम्हे मेरीं कविताएँ अच्छीं लगतीं थीं .. तुम अच्छे हो जाओ जल्दी से … और अपने भाई के साथ आ जाओ मिलने .. मैं तुमसे केहेता हूँ तुम्हारी पसंद का कोई भी गाना सुना दुँगा मैं .. जो~~ तुम्हें पसंद था .. धर्मराज… आँखें खोलो धर्मराज और सुनो~~....जब आओगे ना तो नईं कविताएँ भी सुनाऊँगा… बस जल्दीसे अच्छे हो जाओ धर्मराज .. मेरी आवाज़ सुन रहे हो ना धर्मराज .. “
क्लिप संपते .. कडकडीत उन्हात आक्ख्या युनिटच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी असतं. धर्मराजने एकदाचा गुलजारजींचा आवाज ऐकला या आनंदात पुढला सीन शूट होतो. दुपारी पुन्हा गुलज़ारजींचा फोन येतो .. ते सगळं नीट झाल्याचं .. वॉइस क्लिप झाल्याचं सांगतात आणि त्याची तब्बेत कशीये ते दर तासाभराने कळव असा आदेश सोडून फोन ठेऊन देतात.
त्यानंतर २५ फेब्रुवारीला रुपाली धर्मराजचा संघर्ष सुरुच असल्याचं कळवते आणि १ मार्चचा तिचा संदेश धर्मराजच्या मृत्यूची वार्ता घेऊन येतो.
किशोर कदम लिहितात,
धर्मराज ! मृत्यूनंतर आयुष्य असतं कि नाही ठाऊक नाही. .. अजून तरी माणसांवर पक्षी बसत नाहीत .. ते झाडावरच बसतात .. ज्या झाडांवर पक्षी बसतात, त्या झाडांना सेलिब्रेट करतात, त्या दिवशी तू जन्मलास हे काय कमी आहे ..

धर्मराज ! झाडांमध्ये, पक्षांमध्ये राहिलेल्या कवितेच्या माणसा.. "आनंद " मधली गुलज़ार साहेबांची कविता त्यांच्या वतीने तुला सादर अर्पण ..
" मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है
मिलेगी मुझको
डूबतीं नब्जोंमे जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहेरा लिए जब
चाँद उफक़ तक पहुँचे
दिन अभी पानी में हों
और रात किनारे के क़रीब
ना अभी रात ना दिन
जिस्म जब ख़त्म हों
और रूह को जब सॉंस आए
मुझसे एक कविता का वादा है
मिलेगी मुझको….. "
किशोर कदम "सौमित्र" यांच्याच शब्दात सगळा अनुभव वाचण्यासाठी इथे क्लिक करा...