भारताच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद ‘तालिबान’ शब्द वगळते तेव्हा…

भारताच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद ‘तालिबान’ शब्द वगळते तेव्हा…

भारताच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद ‘तालिबान’ शब्द वगळते तेव्हा…

तालिबान किंवा अन्य कोणत्याही अफगाण गटाने अफगणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी होऊ नये तसंच दहशतवाद्यांना पाठींबा देऊ नये, या वक्तव्यातून संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने तालिबानचा उल्लेख वगळलाय. परिषदेचं नेतृत्व सद्या भारताकडे आहे, हे विशेष !

अफगाणिस्तानच्या भूभागाचा वापर कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी होऊ नये आणि तालिबान किंवा इतर कोणत्याही अफगाण गटाने किंवा व्यक्तीने इतर कोणत्याही देशाच्या भूभागावर कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देऊ नये, यासाठी अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना करण्याच्या महत्त्वाचा सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पुनरुच्चार केला.

हे वक्तव्य आहे, संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेचं १६ ऑगस्ट, २०२१ रोजीचं, जेव्हा तालिबानने अफगणिस्तानवर कब्जा मिळवला. परिषदेचं नेतृत्व सद्या भारताकडे आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायम प्रतिनिधी टी एस कृष्णमूर्ती यांच्याकडून सदरचं वक्तव्य जारी झालं होतं.

इंग्रजीत ते पुढीलप्रमाणे आहे,

The members of the Security Council reaffirmed the importance of combating terrorism in Afghanistan to ensure the territory of Afghanistan should not be used to threaten or attack any country, and that neither the Taliban nor any other Afghan group or individual should support terrorists operating on the territory of any other country.

संपूर्ण वक्तव्य वाचण्यासाठी इथे क्लिक करा !

आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. अफगणिस्तानातील परिस्थितीबाबत भारताने अद्यपि ठोस भूमिका जाहिर केलेली नाही. मात्र, त्याच विषयावर भारतातल्या मुस्लिमांनी बोलावं, भूमिका घ्यावी, असा सरकार समर्थक वृत्तवाहिन्यांचा दबाव आहे. भारतातील मुस्लिमांच्या निष्ठा तालिबान्यांच्या सोबत आहेत, असं चित्र निर्माण करण्यावर वाहिन्यांचा जोर आहे.

एका वाहिनीवरील चर्चेत तर, सरकारची जी भूमिका तीच आमची भूमिका, असं म्हणणाऱ्या चर्चेत सहभागी वक्त्याला धारेवर धरण्याचा प्रयत्न सूत्रधार वृत्तनिवेदिकेने केला होता.

आसाम आणि अन्य राज्यात तर तालिबानचं समर्थन केलं म्हणून मुस्लिमांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.

मात्र, काबुल विमानतळावरील बाॅम्बस्फोटाच्या घटनेनंतर, आता तर, भारताच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेनेच आपल्या वक्तव्यातून तालिबानचा उल्लेख वगळलाय.

“अफगाणिस्तानच्या भूभागाचा वापर कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी होऊ नये आणि कोणत्याही देशाच्या प्रदेशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना कोणत्याही अफगाण गटाने किंवा व्यक्तीने पाठिंबा देऊ नये, यासाठी अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना करण्याच्या महत्त्वाचा सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पुनरुच्चार केला,” असं २७ ऑगस्ट रोजी नव्याने जारी वक्तव्यातील परिच्छेदात म्हटलेलं आहे.

मूळ इंग्रजी परिच्छेद पुढीलप्रमाणे आहे :
“The members of the Security Council reiterated the importance of combating terrorism in Afghanistan to ensure the territory of Afghanistan should not be used to threaten or attack any country, and that no Afghan group or individual should support terrorists operating on the territory of any country,” the paragraph read.

तालिबान किंवा इतर कोणत्याही अफगाण गटाने किंवा व्यक्तीने इतर कोणत्याही देशाच्या भूभागावर कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देऊ नये, या वाक्यातून तालिबान शब्द वगळण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद अर्थात UNSC च्या मतपरिवर्तनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!