मागच्या वेळचे वेंटिलेटर्स, बेड गेले कुठे ? मनसेचा उल्हासनगर मनपा आयुक्तांना सवाल !

मागच्या वेळचे वेंटिलेटर्स, बेड गेले कुठे ? मनसेचा उल्हासनगर मनपा आयुक्तांना सवाल !

मागच्या वेळचे वेंटिलेटर्स, बेड गेले कुठे ? मनसेचा उल्हासनगर मनपा आयुक्तांना सवाल !

कोविड संकटकाळात उल्हासनगरातील सोयीसुविधांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे जे मोजके सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहेत, त्यात मनसे शहरप्रमुख बंडू देशमुख हे एक नाव अग्रेसर आहे. शहरातील सद्यस्थिती आणि त्यावर अपेक्षित उपाययोजनांबाबत देशमुख यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन दिलंय.

उल्हासनगर शहरातील नागरिकांना व्हेन्टीलेटर बेड,ऑक्सिजन बेड, इंजेक्शन, ब्लड,प्लाझमा यासाठी वणवण भटकावे लागत आहे. हे तर सोडाच आपला माणूस मेल्यानंतर जेव्हा त्याला स्मशानात नेलं जातं, तिथे सुध्दा त्या मृत आत्म्याला नरक यातना भोगाव्या लागत आहेत. हे अपयश नक्की कुणाचं ? एवढं सगळं होत असतांना उल्हासनगर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि प्रशासन झोपा काढतोय की काय असा प्रश्न निर्माण होतो !

मागच्या वेळी जेव्हा हे प्लॅटिनम हॉस्पिटल कोविड-19 साठी तयार करण्यात आलं, तेव्हा त्या ठिकाणी २०० ऑक्सिजन बेड,१०० नॉन ऑक्सिजन बेड, ४० व्हेन्टिलेटर, ६४ ICU बेड, ४ डायलिसेस बेड उपलब्ध होते. मग आता एवढे बेड व ते व्हेन्टीलेटर कुठे आहेत ?

जर आज उल्हासनगर महानगर पालिका या हॉस्पीटलच्या मालकाला महिन्याला २० लाख रुपये व इतर खर्च पाहता महिन्याला जवळपास ५० ते ६० लाख रुपये खर्च करत असेल आणि तरी सुध्दा जर या हॉस्पिटलमध्ये शहरातील नागरिकांना वेळेवर बेड व आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसतील तर पूर्वी या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या बाकीच्या सुविधा अचानक नेमक्या कुठे गायब झाल्यात, याची चौकशी होणं आवश्यक आहे.

उल्हासनगर महानगर पालिकेच्या वॉर रुमला फोन केल्यानंतर बेड खाली नाही, डिटेल पाठवा, उद्या किंवा परवापर्यंत बेड खाली झाला की आम्ही तुम्हाला कळवतो किंवा खाजगी रुग्णालयात प्रयत्न करा, अशी उत्तरं दिली जातात.

साहेब दोन ते तीन दिवस जर तो सिरियस रुग्ण घरात राहिला तर तो जगेल का.? साहेब सरकार कोणाचेही असो, जर तळागाळातील अधिकारी सुस्त असतील तर जनतेला वाली कोण असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय..!

तसेच RT-PCR चा (swab ) जर सरकारी लॅबला चेक केला तर त्याचा रिपोर्ट यायला कमीतकमी ४ ते ५ दिवस लागतात ; पण तोच swab जर खाजगी लॅबला चेक केला तर त्याचा रिपोर्ट 48 तासात येतो, हा कोणता प्रकार आहे..?

साहेब, सगळे वातावरण निराशाजनक आहे, ज्या घरातील माणसाला करोना झालाय, त्याला विचारा, आज हालत काय आहे ?

गेली १३ महिने सततच्या लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे व अशा वेळेला त्या घरातील माणूस जेव्हा आजारी पडतो, तेव्हा त्याला खाजगी रुग्णालयात जाणे परवडत नाही व सरकारी रुग्णालयात बेड मिळत नाही. अशा वेळेला त्या माणसाकडे मरणाशिवाय पर्याय उरत नाही.

मग अशा आपतकालीन परिस्थितीत जर उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन शहरातील नागरिकांना मदत करत नसेल तर नागरिक सरकारला जो कर (Tax) भरतात, तो नरकयातना भोगण्यासाठी का ..?

उल्हासनगर महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रोज शेकडो नागरिक येतात व तासनंतास रांगेत उभे असतात की माझा नंबर येईल व मला लस मिळेल. पण नेमका नंबर येतो आणि लस संपते.

नंतर आपल्या लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते की उद्या या म्हणजे परत उद्या चार ते पाच तास रांगेत उभे रहा, पण लस मिळेल याची गॅरंटी नाही !

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लसीकरण केंद्रावर तासतांस रांगेत उभ्या असणाऱ्या नागरिकांसाठी तिथे कोणत्याही मुलभुत सुविधा उपलब्ध नाहीत. या लसीकरण केंद्रावर कुठल्याही प्रकारच सोशल डिंस्टंस नाही, कुठल्याही सरकारी सुचनांचं पालन केले जात नाही.

आम्हांला तर भीती वाटते की आपल्या महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांना कोरोना तर वाटला जात नाही ना.?? महोदय लसीकरण केंद्राच्या नियोजनाबाबत तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.

तरी आमच्या खालील मागण्यांबाबत आपण तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी आम्ही अपणास नम्र विनंती करीत आहोत.

१) प्लॅटिनम हॉस्पिटलमधील व्हेन्टिलेटर व ऑक्सिजन बेडची संख्या तात्काळ वाढविण्यात यावी.

२) खाजगी हॉस्पिटलचे 80% बेड उल्हासनगर महानगपालिकेने तात्काळ ताब्यात घ्यावेत व याठिकाणी फक्त उल्हासनगर शहरातील नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे.

३) संशयित रुग्णांसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात तसेच या संशयित रुग्णासाठी रेमडिसिवीर इंजेक्शचीही व्यवस्था करण्यात यावी.

४) उल्हासनगर महापालिकेच्या टेस्टींग लॅब मधून RT-PCR टेस्टचा रिपोर्ट २ दिवसात कसा उपलब्ध होईल, यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात.

५) महापालिकेत येणाऱ्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवून शहरातील रुग्णांना हे इंजेक्शन तात्काळ कसे उपलब्ध होईल, या साठी उपाययोजना करण्यात याव्यात.

६) उल्हासनगर महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्राची सख्या तात्काळ वाढविण्यात यावी. तसेच कोविड – 19 ची लस खाजगी रुग्णालयाला न देता जास्तीतजास्त लस महापालिकेच्या लसीकरण केंद्र वर उपलब्ध करुन दयाव्यात.

आमच्या वरील मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी आम्ही अपणास नम्र विनंती करीत आहोत. अन्यथा शहरातील नागरिकांच्या न्यायहक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलनाचा पविञा घ्यावा लागेल व त्यानंतर उद्भवणारया परिस्थितीस सर्वस्वी आपण व आपले प्रशासन जबाबदार असेल, याची नोंद घ्यावी.

 

 

 

 

बंडू देशमुख

उल्हासनगर शहरप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
+91 93244 94949 /

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!