कोविड प्लाझ्मा कोण दान करू शकतं ?

कोविड प्लाझ्मा कोण दान करू शकतं ?

कोविड प्लाझ्मा कोण दान करू शकतं ?

कोविड (कॉन्व्हलसंट) प्लाझ्मा म्हणजे काय?

जेव्हा एखादा कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला उपचार देऊन कोरोनामुक्त केले जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते म्हणजेच शरीरातील बॅक्टेरियावर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीज प्लाझ्मा मध्ये तयार होतात. कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णावर औषध उपचार करून हव्या त्या प्रमाणात फरक पडत नसेल तर कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाचा प्लाज्मा देऊन (थोडक्यात दुसऱ्याच्या शरीरातील अँटीबॉडीज) देऊन रुग्णाला बर करण्याचा प्रयत्न केला जातो…..

कोविड (कॉन्व्हलसंट) प्लाझ्मा कोण देऊ शकतं?

कोरोना मधून बरा झालेला वय २० ते ५५ वर्षामधील व ६० किलोच्या वर वजन असलेली व्यक्ती हा प्लाझ्मा दान करू शकतो. त्यासाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आल्याच्या २८ दिवसानंतर व पुढील ३ ते ६ महिने प्लाझ्मा दान करू शकतो. तसेच प्लाझ्मा १५ दिवसाच्या अंतराने पुन्हा देऊ शकतो म्हणजेच ३ महिन्यात ६ वेळा प्लाझ्मादान करू शकतो. एक प्लाझ्मा दाता एकावेळेच्या डोनेशनने २ रुग्णांना मदत करू शकतो.

प्लाझ्मा दानाची प्रक्रिया

फक्त कोरोनातुन बरं होऊन चालत नाही तर कोरोना च्या अँटीबॉडीज शरीरात किती प्रमाणात आहेत ह्या साठी IgG (Immunoglobulin G) टेस्ट केली जाते ज्या मध्ये शरीरात अँटीबॉडीज किती प्रमाणात आहेत ह्याची चाचणी केली जाते आणि जर ठराविक निर्देशाच्या पुढे असतील आणि CBC टेस्ट मध्ये फिट बसत असाल तर तुम्ही प्लाझ्मादान करू शकता….. डोनेट करण्यासाठी जवळ पास ४५ मिनिटांचा कालावधी लागतो ज्या मध्ये तुमच्या शरीरातून रक्त घेऊन प्लाझ्मा काढणाऱ्या अफेरेसिस मशीन मध्ये जाते आणि प्लाझ्मा वेगळा करून बाकी रक्त पुन्हा शरीरात सोडल जात.

प्लाझ्मा दानाचे फायदे / तोटे

प्लाजमा दानाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कोविड प्लाझ्मा हा इतका युनिक आहे कि तो साध्या दात्याकडून येत नाही फक्त कोविड मधून बरे झालेलेच हे प्लाझ्मादान करू शकतात ज्याने आपण रुग्णांना वाचवण्यात मोठं योगदान देत असतो. प्लाझ्मा दानाने शरीराला कोणताही त्रास होत नाही ह्या उलट शरीरातून गेलेला प्लाझ्मा २४ तासात पुन्हा तयार होतो.

जेव्हा रुग्णाची परिस्थिती खालावली जाते तेव्हा प्लाझ्मा थेरपी जीवनदानाचं काम करते. एक गोष्ट लक्षात घ्या कि कोविड प्लाझ्मा फक्त कोरोना तुन बरा झालेलाच व्यक्ती करू शकतो. त्यामुळे कोविड मधून बरे झालेल्या लोकांनी पुढे यावे आणि प्लाझ्मा दान करून ६ रुग्णांना जीवनदान देण्याच्या समाजकार्यासाठी हातभार लावावा.

प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असल्यास कृपया संपर्क साधावा :

 

 

जय साटेलकर

संस्थापक अध्यक्ष, युनिक ब्लड मोटिव्हेटर्स, महाराष्ट्र

+91 91361 93899 / +91 93728 68860



हेही वाचा :

सध्याच्या कोविड संकटात प्लाझ्मा डोनर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. लोक यासाठी समाज माध्यमांचा वापर करीत आहेत. परंतु या कामात समन्वयन करण्याची गरज आहे. त्यासाठी कायद्याने वागा लोकचळवळीने पुढाकार घेतला आहे.

या संदेशासोबत एका फॉर्म ची लिंक दिलेली आहे. आपण जर कोविड आजारातून बरे झालेले रुग्ण असाल आणि प्लाझ्मा दान करण्याची आपली तयारी असेल तर आपण सदरचा फॉर्म भरून आपली माहिती आमच्यापर्यंत पोहचवू शकता.

आमचं काम गरजू रुग्ण आणि रक्तदाते यांच्यात समन्वय घडवून देणं असेल.

केवळ प्लाझ्मा दान नव्हें तर, महाराष्ट्रावरील सध्याच्या कोविड संकटात आपलंही सामाजिक योगदान !

कायद्याने वागा लोकचळवळीकडे प्लाझ्मा डोनर म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा :

 

राज असरोंडकर

9175292425 / kaydyanewaga@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!