बशीर अहमद यांच्या शरीरातल्या गोळ्या कोणाच्या ? दहशतवाद्यांच्या की पोलिसांच्या ? तीन वर्षांचा नातू घटनेचा साक्षीदार !

बशीर अहमद यांच्या शरीरातल्या गोळ्या कोणाच्या ? दहशतवाद्यांच्या की पोलिसांच्या ? तीन वर्षांचा नातू घटनेचा साक्षीदार !

बशीर अहमद यांच्या शरीरातल्या गोळ्या कोणाच्या ? दहशतवाद्यांच्या की पोलिसांच्या ? तीन वर्षांचा नातू घटनेचा साक्षीदार !

जगभरातल्या सोशल मिडियावर काश्मिरातील एक फोटो वेगाने फिरतो आहे. एक लहानगा मुलगा रक्ताळलेल्या मृतदेहावर बसून आहे. हा फोटो पाहून कोणाचंही मन पिळवटणारा आहे. रहाणार नाही. तोच ३ मुलगा दुसऱ्या फोटोत एका सीआरपीएफ जवानाच्या कडेवर दिसतो. तो मिलिटरीच्या वाहनातही बसलेला दिसतो.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दुसरा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आतंकवाद्यांनी सामान्य माणसाला गोळ्या घालून मारलं त्याबद्दल आम्ही निंदा करतो तसंच गोळीबारातून लहान मुलाला वाचवणा-या पोलिस जवानाला सलाम करतो असं म्हटलं आहे.

दोन्ही फोटो हे उत्तर काश्मिरमधील सोपोर मॉडेल टाऊन भागातील आहेत. दहशतवादी आणि पोलिसांच्या झालेल्या गोळीबारात बशीर अहमद काशीद (खान) ह्यांचा मृत्यू झाल्याच सांगितलं जात आहे. त्यावेळी त्यांचा तीन वर्षाचा नातू त्यांच्या सोबत होता. आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर ३ वर्षाचा नातू त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी सुरक्षा रक्षकातील एका जवानांनी त्याला आपल्या कडेवर बसवून घटनास्थळापासून दूर नेले. ह्यावेळी काढलेले फोटो इंटरनेटवरुन प्रचंड वायरल झाले आहेत.

ह्या घटनेने संपूर्ण काश्मिर घाटी हादरली आहे. अनेक स्थानिक काश्मिरी लोकांनी ह्या हत्त्येला भारतीय जवानच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. फक्त सोयीचे फोटो राजकारण करण्यासाठी पसरवले जात असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे. आपल्या ह्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी त्यांनी ह्या घटनेचे अजून नवे फोटोज आपल्या अकाउंटवरून शेअर केले आहेत. ज्यात बशीर अहमद ह्यांचा मृतदेह पोलिसांच्याच गाडीखाली दिसतो आहे.

बशीर अहमद खान यांचा मुलगा सोहेल खान ह्यांनीही एका व्हिडिओद्वारे जवानांनाच दोषी ठरवले.

ते म्हणतात,

माझे वडील सकाळी काही कामानिमित्त बाहेर गेले असता फोर्स पोलिसांनीच त्यांना गोळ्या घालून ठार मारलं आहे.

हा व्हिडीओ माध्यमांवर वायरल झाल्यानंतर स्थानिक न्यूज पोर्टल काश्मिरीयतशी बोलताना पोलिसांनी सांगितलं की

सोहेल यांच्या आरोपात काही तथ्य नाही, दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या गोळीबारादरम्यान दहशतवाद्यांच्याच गोळ्या लागून बशीर यांचा मृत्यू झालाय. त्यांच्याबरोबर फोर्स मधील एक जवानही ठार झाला तसेच दोन जवान गंभीर जखमी आहेत.

खरं पाहता सोहेल अहमद किंवा अन्य कोणीही ह्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी नाही. लहानगा काय सांगतो, त्यावरच पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत. द वायर ने दिलेल्या बातमीनुसार, त्यांचा पत्रकार पीडीत कुटुंबाच्या परवानगीने लहानग्याशी बोललात आणि तो हेच सांगतो की आजोबांना पोलिसांनी गोळी मारलीय.

बशीर अहमद हे कंत्राटदार आहेत. जवळच सुरू असलेल्या कामावर लक्ष द्यायला ते घराबाहेर पडले होते. सीआरपीएफ आणि जेके पोलिसांची त्यावेळी संयुक्त गस्त‌ सुरू होती. सोपोरमधील माॅडेल टाऊन नाक्यावर जवान पोहचले असताना एका मस्जिदीच्या आसऱ्याने लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी लोकांची पांगापांग झाली. जे मोटारीतून आले होते, ते मोटारी सोडून पळाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बशीर अहमदही मोटारीबाहेर पडले. तेव्हा त्यांना दहशतवाद्यांकडून सुटलेल्या गोळ्या लागल्या. ते खाली पडले तेव्हा नातू त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होता. त्या नातवाची सुटका जवानांनीच केली व त्याला घरी सोडलं.

बशीर अहमद यांच्या मुलाचा आरोप आहे की जवानांनीच वडिलांना कारबाहेर काढून गोळ्या घातल्या. त्यात तथ्य असलं तर लहानगा पोलिसांकडे जाण्याची शक्यता धूसर होते. मुलगा जर जवानांकडे निश्चिंत आहे तर दोन शक्यता आहे की एकतर पोलिसांवरचा आरोप सपशेल खोटा आहे किंवा नेमक्या कोणाच्या गोळ्या आजोबांना लागल्यात, हे सांगणं त्यांच्यासाठी कठीण आहे. दोनपैकी एकाच बाजूचे लोकच मुलाच्या नजरेस पडले असल्यानेही त्याने पोलिसांचं नाव घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या घटनेवरून देशातलं राजकीय वातावरण तापलंय. भाजपा प्रवक्ता संबीत पात्रा यांनी आजोबांच्या मृतदेहावर बसलेल्या नातवाच्या फोटोचा संबंध पुलित्जर पुरस्काराशी जोडल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर संवेदनहीनतेचा आरोप झालाय, पण नेहमीप्रमाणे देशभक्ती, देशद्रोह, पाकिस्तान, राष्ट्रवाद, गद्दार वगैरेंचा आधार घेत पात्रांनी आपली बाजू लावून धरलीय.

कुठल्याही आॅपरेशनवर जाताना जवानांनी मोबाईल सोबत ठेवणं अनुज्ञेय नाही. त्यामुळे या घटनेतील फोटो, विडियो कोणी काढलेत, जवानांनीच काढलेत तर बाहेर कसे आले, असे अनेक प्रश्नही सोबत निर्माण झाले आहेत. भारतातल्या सद्यस्थितीत कुठल्याच बाजूने संपूर्ण सत्य लोकांसमोर येत नसल्याने नेहमीप्रमाणे याही घटनेत “मन की बात” लाच ऊत आलेला आहे.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!