गौरी लंकेशचं भय नेमकं कोणाला?

गौरी लंकेशचं भय नेमकं कोणाला?

गौरी लंकेशचं भय नेमकं कोणाला?

प्रसिद्ध लेखिका लंकेश पत्रिकेच्या संपादक गौरी लंकेश ह्यांचा ५ सप्टेंबर २०१८ रोजी गोळ्या घालून निघृण खून करण्यात आला. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांचे पत्रकारिता मूल्य हे त्यांच्या सहका-यांनी नानू गौरी डॉट कॉम नावाच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजवरुन जिवंत ठेवले.

नानू गौरी डॉट कॉम ही वेबसाईट आजही कन्नड भाषेतील अग्रगण्य वेबसाईट आहे. असंख्य लोक ह्या वेबसाईट वरचे लेख वाचत असतात ; पण गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर ह्या वेबसाईटला कट्टरतावादी विचारधारेच्या लोकांनी रिपोर्ट करायला सुरुवात केली आणि अचानक लेख प्रकाशित करायला पेजला अडचणी निर्माण होऊ लागल्या. बरेचशे महत्वाचे लेख फेसबुकने काढून टाकल्याचा आरोपही नानू गौरीच्या संपादकीय टिमने केला आहे.

आपल्या निवेदनात संपादकीय टीमने म्हटलं आहे की “नानू गौरी डॉट कॉमला फेसबुकने ब्लॉक केलेले असून आमच्या मतांना तिथे जागाच उरलेली नाही. विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याच्या कारणावरुन आमचे आधी प्रकाशित झालेले बरेचसे लेखही फेसबुकवरुन काढून टाकण्यात आले आहेत आणि नविन लेख फेसबुकवरुन प्रकाशित करताना आम्हाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

टीम म्हणते की आम्ही फेसबुकशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला आहे. नानू गौरी डॉट कॉम ही केवळ सत्याधारीत पत्रकारिता, संशोधन,अभिव्यक्तीसाठी काम करणारी कन्नड भाषेतील महत्वाची वेबसाईट असून आम्ही पत्रकारिता मूल्यांच्या अधिन राहूनच काम करतो आहोत.

विशिष्ट कट्टरतावादी समुदायाने रिपोर्ट केलेल्या चॕनलवर खरंच भावना भडकवणारा वृत्तांत असतो का? अशा खोट्या मोहिमेची पडताळणी करण्यासाठी फेसबुककडे कोणतीही यंत्रणा नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एखादी दर्जेदार वेबसाईट एखाद्या मोहिमेचा भाग होऊन बंद पाडली जात आहे का, याची पडताळणी करण्यासाठी डिजिटल जगतात मुलभूत व्यवस्था असायला हवी, अशी मागणी नानू गौरी डॉट कॉमने केली आहे.

नानू गौरी चे संपादक गुरूप्रसाद यांनी मिडिया भारतला सांगितलं की फेसबुक पेज रिस्टोअर झालंय आणि फेसबुक आता म्हणत आहे की ही तांत्रिक चूक आहे. पण आम्हाला माहितीय की आमच्याविरोधात सुनियोजित कॅम्पेन सुरू होतं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!