प्रत्येक ॲक्टरला वाटत असतं की आयुष्यात साला एकदा तरी बच्चन सोबत काम करायला मिळावं. सुप्त इच्छा कधीतरी पूर्ण होऊ देत यासाठी प्रार्थना करत असतो. किती स्वप्नं पडतात की आपण बच्चन सोबत सीन करतोय याची. निदान मला तरी पडतात. माझ्यासाठी स्वप्नवतच आहे ते.
पण झुंडच्या निमित्ताने छाया कदम तू ते खरं करून दाखवलंस. एक सीन मिळावा किंवा एक डायलॉगही चालेल किंवा पासिंगसुद्धा मिळालं त्यांच्या फ्रेममध्ये तरी भरून पावू असं वाटतं. पण तू चक्क त्यांच्या बायकोचा रोल किंवा पार्टनर म्हणू शकतो असा रोल केलास. तेवढ्याच ताकदीनं उभी राहिलीस. कुठून आणलंस एवढं बळ यार?
खरंच एक अभिनेत्री म्हणून, एक मैत्रीण म्हणून तुझा अभिमान वाटतो आणि तुझ्या संपूर्ण अभिनय प्रवासाचं कौतुक ही. और क्या चाहीए ! कसलं भारी वाटतंय काय सांगू यार.
यासाठी नागराज मंजुळेचे आभार मानेन की त्याने तुझ्यातल्या कसदार अभिनेत्रीवर, मैत्रिणीवर एवढा विश्वास दाखवला! किती कन्विक्शन असेल त्याला तुला कास्ट करायचं!

नाहीतर इथं बरेच जण नुसतंच 'तू किती भारी अभिनेत्री आहेस, कमाल मैत्रीण आहेस' असं सांत्वनपर बोलून 'अगं, प्रोड्यूसरला, प्रथितयश ॲक्टरसमोर अमुक अमुक अभिनेत्रीच कास्ट करायचीय गं, माझ्या हातात असतं ना तर तुलाच कास्ट केलं असतं' हे 'बच्चन' देऊन पळ काढतात.
असो, तुला त्यांच्या सोबत काम करताना पाहून वाटलं साला आपणच काम करतोय. क्या बात है... Proud proud and extremely happy ! Love u रे !
हेमांगी कवी - धुमाळ
सिनेनाट्य अभिनेत्री
यांच्या फेसबुक वाॅलवरून साभार