मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
भाजपा नेत्या पंकजा मुंडे एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर संतापल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी ‘एबीपी माझा’वर चुकीचं वृत्त दिल्याचा आरोप केला आहे.
पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करताना “मुघल परवडले, पण महा विकास आघाडी सरकार नको”, असं वक्तव्य केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ ने दिलं होतं. ते खोडसाळ असल्याचा आरोप करत पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वृत्तवाहिनीचा समाचार घेतला आहे. अशा गोष्टी वारंवार होत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
‘अशा प्रकारचे स्टेटमेंट मी दिलेले नाही मी कधीही असे बोलत नाही. एबीपीमाझाने तात्काळ माफी मागावी आणि ही बातमी वापस घ्यावी. हे अत्यंत अयोग्य आहे व हे वारंवार होण्याबद्दल मला खंत वाटते.’ असं ट्वीट पंकजा यांनी केलं आहे.
‘एबीपी माझा’ च्या वतीने पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सदर बाब हिंगोलीतील पत्रकारावर ढकलून दिलगिरी व्यक्त केली आहे.