अनुपम खेर आणि शशी थरूरमध्ये का जुंपलीय?

अनुपम खेर आणि शशी थरूरमध्ये का जुंपलीय?

अनुपम खेर आणि शशी थरूरमध्ये का जुंपलीय?

काँग्रेस नेता शशी थरूर यांनी एक जुनं ट्वीट उकरून काढल्यावर अभिनेता अनुपम खेर यांनी संतापाने शशी थरूर यांना बेरोजगार आणि मानसिक तोल गेलेला म्हटलं ; त्यावर शशी थरूर यांनीही ६२, ७५, ८४ च्या घटना उकरून काढणारे पण बेरोजगारच म्हणता येतील का, असा प्रतिटोला अनुपम खेर यांना लगावलाय.

अनुपम खेर यांचं जुनं ट्वीट ९ आॅक्टोबर २०१२ चं आहे. त्यात त्यांनी एडवर्ड एबे यांचं वक्तव्य नमूद केलंय. ते म्हणतात,

एक सच्चा देशभक्त सरकारच्या विरोधात जाऊन आपल्या देशाच्या बाजूने उभा राहतो.

अनुपम खेर यांचं ट्वीट रिट्वीट करताना शशी थरूर म्हणतात, मी अनुपम खेर यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. सोबत थरूर यांनी मार्क ट्वेन यांच्या उद्गारांचा संदर्भ दिलाय. तो पुढीलप्रमाणे आहे.

सच्चा देशभक्त नेहमी देशासोबतच असतो आणि कधी तशा लायकीचं असेल तर सरकारसोबत !

त्यावर अनुपम खेर यांनी शशी थरुरांना चिडून उत्तर दिलंय. ही बेरोजगार आणि मानसिक तोल गेलेल्यांची कामं आहेत. अनुपम खेर म्हणतात की माझं ट्वीट ज्यांच्यासाठी होतं, ते आजही भ्रष्टाचाराचं प्रतिक आहेत.

शशी थरूर यांनी काही अनुपम खेर यांचा पिच्छा सोडलेला नाही. ते म्हणतात, माझं हे ट्वीट सीमेवर अपयशी ठरलेल्या अपयशी सरकारसाठी आहे.

काँग्रेस राजवटीतील पेट्रोल डिझेल दरवाढीवरून अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अक्षयकुमारसारख्या कलाकारांनी सरकारची खिल्ली उडवणारी ट्वीट केली होती. आज ती सगळी मंडळी गप्प आहेत. ट्वीटरवर शेकडो लोक या कलाकारांना त्यांच्या मागच्या प्रतिक्रियेची आठवण करून देतायंत आणि आरोप करतायंत की आपण गप्प आहात, याचा अर्थ आपली त्यावेळची प्रतिक्रिया भाजपाच्या इशाऱ्यावर होती. एकप्रकारे भाजपा-मोदी समर्थनाने ही कलाकार मंडळी तोंडावर पडलीत आणि त्यामुळेच ती चीडचीड करताना दिसतायंत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!