वंचित बहुजन आघाडीला बच्चू कडूंविरुद्ध का हवीय पोलीस चौकशी ? राज्यपालांना परवानगीसाठी साकडं !

वंचित बहुजन आघाडीला बच्चू कडूंविरुद्ध का हवीय पोलीस चौकशी ? राज्यपालांना परवानगीसाठी साकडं !

वंचित बहुजन आघाडीला बच्चू कडूंविरुद्ध का हवीय पोलीस चौकशी ? राज्यपालांना परवानगीसाठी साकडं !

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या अपहार प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलीस चौकशी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केलीय. बनावट दस्तऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करून अपहार केल्याप्रकरणी अकोला न्यायालयाने पालकमंत्री बच्चू कडू सकृतदर्शनी दोषी असल्याचं निरीक्षण दिलं असल्याची माहिती राज्यपालांना यावेळी देण्यात आली.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष  रेखाताई ठाकूर,  प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि मुंबई महानगर अध्यक्ष अबुल हसन खान हे उपस्थित होते.

सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी राजभवनात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. संपूर्ण कागदपत्रं बघून या प्रकरणात कायद्याने राज्यपाल यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे, अशी तरतूद असल्याचे कायदेशीर दस्तावेज सादर करायला राज्यपालांनी सांगितलं आहे. तसंच मागितलेली कायदेशीर कागदपत्रं सादर केल्यानंतर तात्काळ अकोला पोलीस अधीक्षक यांना पालकमंत्री बच्चू कडू यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले जातील असं राज्यपाल म्हणाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिलीय.

महाविकास आघाडीचे राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा नियोजन समितीने ठरवून दिलेल्या रस्ते कामात फेरफार करत आर्थिक अपहार केल्याचा आरोप आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचं देखील नाव याप्रकरणी प्रामुख्याने समोर आलं आहे. काही इतर जिल्हा मार्ग (इ.जि.मा) आणि ग्राम मार्ग (ग्रा.मा) हे शासन मान्य क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामांची यादी जिल्हा परिषदेला पाठवून कडू यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आलं होतं.

या संदर्भातील सर्व पुरावे आणि संबंधित माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा नियोजन समितीने नियोजित न केलेले इ.जि.मा आणि ग्रा.मा नंबर इ-टेंडरींग मध्ये टाकून त्याकरिता आलेला निधी देखील लागोलग काढल्याचे आरोप पालकमंत्री कडू यांच्यावर आहे.

या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना देखील या संदर्भात निवेदन दिलं होतं. अखेर कलम १५६/३ अंतर्गत जिल्हा न्यायालयात याचिका करण्यात आल्यावर न्यायालयाचं निरीक्षण कडू यांच्याविरोधात आल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!