डॉ. महेंद्र भवरेंविरोधात कारवाई होईल का ?

डॉ. महेंद्र भवरेंविरोधात कारवाई होईल का ?

डॉ. महेंद्र भवरेंविरोधात कारवाई होईल का ?

सध्या काॅलेज, विद्यापीठ हे स्त्रियांवर, मुलींवर अत्याचार करण्याचे अगदीच योग्य ठिकाण आहे की काय असे मला वाटायला लागलं आहे, असं खळबळजनक मत सामाजिक कार्यकर्त्या व माहेर संस्थेच्या अध्यक्षा अरूणा सबाने यांनी व्यक्त केलंय. स्त्रीयांच्या शारिरीक शोषणाचं एका महिन्यातलं आठवं प्रकरण त्यांनी समोर आणलंय. मुंबई विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. महेंद्र भवरे यांच्यावर एका मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप सबाने यांनी केलाय.

दीपाली चव्हाण प्रकरणाचा पाठपुरावा करताना अरूणा सबाने यांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन पीडितांना केला होता. त्यानंतर अनेकींनी आपली व्यथा त्यांच्यापर्यंत पोहचवली. त्यातूनच डॉ. भवरेंचं प्रकरण बाहेर आल्याचं सबाने यांनी म्हटलं आहे.

मुंबईत न्याय मिळाला नाही म्हणून ती नागपुरात आपल्याकडे आल्याचा दावा अरूणा सबाने यांनी केलाय. पीएचडीची संबंधित विद्यार्थिनी डॉ. भवरे यांच्याकडे डीटीपी ऑपरेटर चं काम करायची. महिनाभर काम केल्यानंतर तिला त्यांचं बदललेलं वागणं लक्षात आलं. कालपर्यंत बरे असलेले आपले सर असे अचानक कसे बदलले याचा ती विचार करायला लागली आणि त्यानंतर ती सावध वावरू लागली होती.

ते तिला सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावू लागले. तिच्या खुर्चीला खेटून बसणे, तिला चोरटे स्पर्श करणे, तिच्याकडे बघत राहणे भवरेचें सुरु झाले. एक दिवस शेजारच्या केबिनमध्ये कुणी स्त्री सहकारी नाही, हे लक्षात येताच डॉक्टरसाहेबांनी डाव साधला आणि तिच्या अंगचटीला येऊन अचानक त्यांनी तिला कपाटाजवळ ढकलत नेले आणि तिचा जबरदस्ती किस / मुका घेतला.

अहो सर हे काय करता’ असं म्हणून त्यांना जोरात ढकलून देऊन तेथून कशीतरी तिने स्वतःची सुटका करून घेतली, आणि तेथून पळ काढला. ती खूप घाबरलेली होती. कुणाला सांगावे, तिला कळेना. तरी हिम्मत करून तिच्या दोन मैत्रिणी आणि त्याच कॉलेज मध्ये असलेल्या प्रा.वंदना महाजन मॅडम यांना तिने आपबिती सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाने तिने त्याच कॉलेजच्या निरगुडकर मॅडमकडे लेखी तक्रार दिली. तक्रार केली म्हणून पुढे आजपर्यंत तिलाच त्रास देणं सुरु आहे.

या मुलीने तक्रार केल्याबरोबर आणखी तीन मुली समोर आल्या आणि तोंडी तक्रार करणाऱ्या तर खूपच आहेत, असे या विद्यार्थीनीचे म्हणणं आहे. या आधीच्या कॉलेजमध्येही भवरेंनी हाच पराक्रम गाजवला असेही ती सांगते. कुणा मुलीवर मागून झडप घालणे, कुणाचे केस पिंजरणे, तिचे केस स्वतःच्या हाताने उडवणे , मुलींकडे एकटक बघत राहणे, असे अनेक प्रकार हळूहळू पुढे येऊ लागल्याचं सबाने यांचं म्हणणं आहे.

विद्यापीठाने समिती नेमली, विमेन्स डेव्हलपमेन्ट सेल कडे हे प्रकरण पाठविण्यात आलं. चौकशीअंती भवरे दोषी असल्याचे स्पष्ट झालं. त्यावेळी तीन मुलींनी समितीसमोर आपली आपबिती सांगितली. त्यात भवरेंवर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट सूचना दिली गेली. त्यानंतरही विद्यापीठाने मात्र प्राध्यापकालाच झुकतं माप देऊन त्याची शिक्षा कमी केली. आणि नंतर तर ती संपवलीच. जाऊदे बाळा, विसर. त्यांनी सॉरी म्हटले ना? जाऊ दे. त्याच्या करिअर चा विषय आहे, असं अनेकांनी पीडितेलाच समजावलं.

मिडिया भारत न्यूज ने या संदर्भात डॉ. महेंद्र भवरे यांना वाॅटस्एप संदेश पाठवून त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपण लवकरच यावर स्पष्टीकरण करणार असल्याचं उत्तरात म्हटलं आहे.

”माझा लैंगिक छळ झाला” असं धाडसाने सांगणाऱ्या पीडित मुलीची मदत करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम मुंबई विद्यापीठाने तर केलंच , पण मुंबई परिसरातल्या अनेक नामवंत स्त्री पुरुष साहित्यिक आणि स्वतःला सामाजिक कारकर्ते म्हणवणाऱ्यांनीही भवरेला पाठीशी घातले याबाबत अरूणा सबाने यांनी खंत व्यक्त केलीय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!