पुण्यात उच्चशिक्षित सरपंच महिलेला सर्वांसमक्ष मारहाण !

पुण्यात उच्चशिक्षित सरपंच महिलेला सर्वांसमक्ष मारहाण !

पुण्यात उच्चशिक्षित सरपंच महिलेला सर्वांसमक्ष मारहाण !

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना गावातील लसीकरण केंद्रावर मारहाण झाल्याची घटना घडलीय. सुजीत काळभोर याच्यावर मारहाणीचा आरोप आहे. काळभोर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचा दावा भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलाय.

सरपंच गौरी गायकवाड भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या, तर त्यांचे पती चित्तरंजन गायकवाड भाजपाचे पुणे जिल्ह्याचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते. आपण भाजपाचा वर्षभरापूर्वीच राजीनामा दिलेला असून, या घटनेशी भाजपाचा काही संबंध नसल्याचा दावा चित्तरंजन गायकवाड यांनी केलाय.

जिल्हापरिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असली तरी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची २०१७ ची निवडणूक खूपच चुरशीची झाली होती. नंदू काळभोर आणि चित्तरंजन गायकवाड यांच्या पॅनलमध्ये रस्सीखेच होती. दोघांनी जोरदार ताकद लावत साम, दाम, दंड, भेदांचा वापर करत निवडणूक लढवली होती. सरशी गायकवाड पॅनलची झाली होती. १७ पैकी १४ जागा गायकवाड यांच्या परिवर्तन पॅनलने जिकल्या होत्या व गौरी गायकवाड सरपंच झाल्या.

गौरी गायकवाड या उच्च शिक्षीत असुन, त्या माजी पंचायत समिती सदस्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी कदमवाकवस्ती-फुरसुंगी या जिल्हा परिषद गटातुन भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुकही लढवली होती. मात्र त्यांना पराभाव पत्कारावा लागला होता. जिल्हा परीषदेची निवडणुक संपताच, त्यांनी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन, जनसंपर्क वाढवला होता.

माजी सरपंच नंदू काळभोर हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी मनिषा गौरी गायकवाड यांच्यासमोर पराभूत झाल्या होत्या. ग्रामपंचायतीत उपसरपंचपद राष्ट्रवादीच्या बाबासाहेब काळभोर यांच्याकडे आहे. याचाच अर्थ गायकवाड आणि काळभोर समर्थकांत आधीपासूनच राजकीय धुसफूस आहे.

दरम्यान, सरपंच गौरी गायकवाड यांनी जारी केलेल्या व्हिडिओत त्यांनी, सरपंच म्हणून सक्षमतेने काम करताना आपल्यावर नेहमीच अन्याय होतो, असा आरोप केलाय व आपल्यावरील अन्यायाबाबत महिलांनी आवाज उठवावा, असं आवाहनही केलंय.

आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर आल्यानंतर सगळ्यांचीच बांधाबांध व श्रेयवाद सुरू आहे. नवा वाद कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या श्रेयावरून झाल्याचं समजतं. शुक्रवारी, 3 सप्टेंबर 2021 रोजी सकाळपासून कदमवाकवस्तीतील 800 नागरीकांचं कोविशिल्डचं लसीकरण कवडीमाळवाडी जि. प. शाळा – 300 डोस, संभाजीनगर एंजल हायस्कुल – 300 डोस, कदमवस्ती जि. प. शाळा – 200 डोस या ठिकाणी सुरू होतं.

लसीकरण केंद्रावर गायकवाड समर्थक आणि काळभोर समर्थकांत आपसांत वाद होऊन हाणामारी झालीय. दोन्ही बाजूच्या लोकांनी परस्परांविरोधात मारहाणीचा आरोप केलाय.

 

 

गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकारी गलिच्छ शिवीगाळ करणं, त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणं, महिला सरपंचाला मारहाण करणं, याचं लायसन्स दिलंय का ? आणि आरोपी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप मी नाही केला, तर स्वत: त्या महिलेने सांगितलयं जिला मारहाण करण्यातं आलीय.

चित्रा वाघ, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा

सुजित काळभोरवर गौरी गायकवाड आणि त्यांचे समर्थक अविनाश बडदे यांना मारल्याचा आरोप आहे तर गौरी गायकवाडांचा मुलगा, अविनाश बडदे आणि इतर नातेवाईकांनी सुजित याला मारहाण केल्याचाही आरोप आहे. लोणी काळभोर पोलिसांत परस्परांनी तक्रारी केल्यायंत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्याकडे सदर प्रकरणाचा तपास आहे.

गौरी गायकवाड यांचा कार्यकर्ता अविनाश बडोदे आणि सुजित काळभोरचा पाहुणा कोणी कदम यांचा तीनेक दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याचे पडसाद एंजेल शाळेतील लसीकरण केंद्रावरील घटनेत उमटल्याची माहिती वपोनि मोकाशी यांनी मिडिया भारत न्यूज ला दिली.

सदर घटनेत पक्षीय वैर नसल्याचेही किंवा घटनेशी लसीकरणाचाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. गौरी गायकवाड यांनी भाजपा सोडली असल्याचं गायकवाड यांनीच एसीपींसमोर सांगितलंय, असं मोकाशी म्हणाले.

बडदे आणि काळभोर यांच्यातील मारहाणीत गौरी गायकवाड मध्ये पडल्यावर त्यांनाही मारहाण झाली. सुजित काळभोर विरोधात गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालीय, तर त्याच्याही तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आलाय, असं मोकाशी यांनी सांगितलं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!