चीनच्या वुहान शहरात जंगली प्राण्यांच्या सेवनावर पाच वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे.‌ करोना महामारीचा संसर्ग हा प्राण्यांकडून माणसांकडे झाला आहे, असा काही संशोधकाचा दावा आहे त्याच धरतीवर हा निर्णय वुहान प्रशासनाने खबदारी म्हणून घेतला आहे. सदर नियम १ मे ते पुढील पाच वर्षासाठी काटेकोरपणे पाळला जाईल असं प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलं आहे.

जानेवारी मध्ये चीन मधल्या काही तज्ञांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की बाजारातील ओल्या मांस विक्रीमधूनच हा आजार शहरभर पसरलेला आहे. वुहान शहरात जगातील सर्वात मोठी जंगली प्राण्यांची विक्री होते. ह्यात समुद्रतील मासे, घुबड,कोल्हे, मगरी, लांडगे, साप, उंदीर, मोर, इ.चा प्रामुख्याने सहभाग आहे. वन्यजीवी प्राण्यांच्या व्यापार हा चीन मध्ये थोडाथोडका नसून तब्बल ५२० बिलीयन युवानच्या घरात आहे.

करोना विषाणूचा पहिला रुग्ण ह्याच शहरात सापल्यामुळे त्याच्या प्रसाराचा शोध हा मांसाहारापाशी येऊन थांबला आणि जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सी फूड होलसेल मार्केट बंद करण्यात आले होते.

केवळ चीनमध्ये या विषाणुंमुळे 4,634 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 82,965 लोकांना संसर्ग झाल्याचा निष्पन्न झालं. जागतिक पातळीवर, कमीतकमी 324,000 लोक मरण पावले आहेत आणि जवळजवळ 50 दशलक्ष लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे जगभरातून चीन हा टिकेचा धनी झाला.

चीनचे हुबेई प्रांत, ज्यापैकी वुहान हे राजधानीचे शहर आहे, यांनी मार्चमध्ये वन्य प्राण्यांच्या खाण्यावर बंदी घालण्याचा कायदा केला आहे.केवळ शेती आधारित पीकांची विक्री केली जाईल असा निर्णयही घेण्यात आला आहे.

चीनच्या सर्वोच्च विधान समितीने 24 वन्य प्राण्यांच्या सर्व व्यापार आणि वापरावर बंदी घालण्यासाठी नवीन कायदा केला. बीजिंगने अद्याप वन्य प्राणी संरक्षण कायद्यात सुधारणा केली नाही, परंतु देशाला साथीच्या रोगाविरूद्ध लढाईत मदत करण्यासाठी तात्पुरती बंदी ‘अत्यावश्यक’ आणि ‘तातडीची’ होती, असे पीपल्स डेली या राज्य वृत्तपत्राने लिहिले आहे.आणि ह्याच कायद्याची अंमलबजावणी वुहान प्रशासन करणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर १ मे पासून चीनच्या वुहान शहरातील हे मांसाहारी मार्केट पाच वर्षाच्या काळासाठी बंद असणार आहे; वन्यजीवी प्राण्यांचा व्यापार हा पाच वर्षाच्या कालावधीसाठी गुन्हा असेल.

News by Ankush Hambarde Patil


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!