मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
राज्यसेवा आणि संयुक्त परिक्षेचा निकाल आणि परिक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे. युवक काँग्रसचे प्रवक्ते मा. बालाजी गाढे यांनी मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
युपीएससीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे ती एमपीएससीच्या वेळापत्रकाची. ग्रामीण भागातील युवक/युवती मोठ्या प्रमाणात शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी शहरात येतात.अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणारा हा मोठा वर्ग आहे.
करोना महामारीच्या संकटात सुद्धा ह्या विद्यार्थ्यांचा अभ्यास वैयक्तिक पातळीवर चालूच आहे.पण त्यांच्या समोर ह्या वर्षीचं राज्यसेवा परिक्षेचे वेळापत्रकच जाहीर झालेलं नसल्याने मोठे प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
राज्यात मोठा विद्यार्थी वर्ग स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी दिवसरात्र मेहनत घेतो आहे.हा बहुतांश वर्ग ग्रामिण भागातील आहे. प्रशासकीय नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून गरीब परिस्थितीत ही सगळी तरुण मंडळी संघर्ष करत आहे यावर्षी करोना मुळे परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि मागील वर्षीच्या परिक्षांचा निकाल अजूनही जाहीर झाला नाही त्यामुळे विद्यार्थी वर्ग संभ्रमात आहे.
UPSC ने त्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र शासन राज्यसेवेचे वेळापत्रक कधी जाहीर करणार असा सूर विद्यार्थी वर्गातून उमटतो आहे.
मागील वर्षातील निकाल जाहीर करुन नवे सुधारित वेळापत्रकही जाहीर करावे ,अशी मागणी प्रवक्ते बालाजी गाढे यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने बालाजी गाढे यांच्या पत्राची दखल घेतलेली आहे.
News by MediaBharatNews Team