टेम्पोने धडक दिली, डोक्यात राॅडने प्रहार केला; अंगावर थुंकलेसुद्धा ! आंतरजातीय प्रेम केल्याची शिक्षा !!

टेम्पोने धडक दिली, डोक्यात राॅडने प्रहार केला; अंगावर थुंकलेसुद्धा ! आंतरजातीय प्रेम केल्याची शिक्षा !!

टेम्पोने धडक दिली, डोक्यात राॅडने प्रहार केला; अंगावर थुंकलेसुद्धा ! आंतरजातीय प्रेम केल्याची शिक्षा !!

भारताने किती जरी पुढारलेपणाच्या बाता मारल्या आणि त्यातही महाराष्ट्राने किती जरी पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवला तरी जातीयवाद हेच इथलं ठळक वास्तव आहे. इथलं सगळं राजकारणच ज्यावर देशाची लोकशाही उभी आहे, तेच जातीआधारित असल्याने जातीयवाद राजकारणाचं भांडवल आहे. त्यामुळे तो कमी होण्याऐवजी पद्धतशीरपणे जोपासण्याचं काम राजकीय मंडळी करत असतात. त्यामुळे जातीयवादाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत.

महाराष्ट्रात अरविंद बनसोडच्या मृत्यूची चर्चा अजून निवळली नाही, तोवर पुण्यातून एका युवकाच्या हत्येची घटना पुढे आली आहे. सदर घटना ही पिंपळे सौदागर येथे घडली असून मुलीवर प्रेम करतो या रागातून विराज जगताप या अवघ्या २० वर्षीय युवकाची हत्या मुलीच्या नात्यातील लोकांनी मिळून केलीय.

विशेष म्हणजे आरोपींची नावं विराजच्या फेसबुकवरील मित्रयादीतही दिसताहेत. याचा अर्थ ते एकमेकांना परिचित असावेत. तरीही, मैत्री, ओळख, परिचय, माणुसकीपेक्षा जात वरचढ ठरलीय. आरोपींची राज्य सरकारातील एका महत्त्वाच्या राजकीय पक्षाशी जवळीक दिसून येते. ते राजकीय धागेदोरे सरकारातील एका महत्त्वाच्या नेत्यापर्यंत जातात. त्यामुळे इथे पुन्हा न्याय वरचढ ठरतो की राजकीय हितसंबंध हा प्रश्न निर्माण होतोच.

विराजचे काका जितेश वसंत जगताप यांची या संदर्भात पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद आहे. पोलिसांनी आरोपी जगदीश काटे व इतरांविरोधात ३०६/२०२० क्रमांकाने गुन्हा नोंदवलाय.

पिंपळे सौदागर येथे जगताप नगरातील बुद्ध विहाराजवळ राहणारा विराज ७ जून रोजी रात्री १० च्या सुमारास आपल्या मोटरसायकल वरुन जात असताना त्याच भागातील शिव बेकरीजवळ एका टेम्पोने आधी त्याला धडक मारण्यात आली. विराज खाली पडल्यानंतर टेम्पोतील हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे,कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे,हर्षद कैलास काटे ह्या सहा जणांनी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. पाठीत दगडही घातला.

विराज जगतापचे गावातीलच आरोपींच्या नात्यातील मुलीवर प्रेम होते. त्याच रागातून जगदीश काटे व इतरांनी हा हल्ला केला होता. जगदीश काटे हा विराजला म्हणाला –

” तु महारा मांगाचा आहेस, तुझी लायकी आहे का मुलीवर प्रेम करायची “

विराजला मारल्यानंतर तो बेशुद्ध पडला. बेशुद्धावस्थेतील विराजवर जगदीश काटे थुंकलासुद्धा !

बेशुद्ध विराजला तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू ओढवला.
सांगवी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ , अनुसूचित जातीजमातींवरील अन्याय अत्याचारास प्रतिबंध कायद्यातील ३(१) आर, एस, ३(२) व्हीए, ३(२) व्ही, ६, महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७(१) सहित १३५ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस उपनिरीक्षक जी डी माने यांच्याकडे तपास आहे.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!