अव्यवस्थेला व्यवस्थित उत्तर
कायद्याने वागा लोकचळवळीचा ‘सावित्री पुरस्कार’ महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात एक प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. २०१५ पासून कायद्याने वागा लोकचळवळीच्या सावित्री पुरस्काराची सुरुवात झाली. जानेवारी महिन्यात सावित्री उत्सवात विविध क्षेत्रातील पाच स्त्रियांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो. किशोरवयीन मुलींपासून प्रौढ स्त्रियांपर्यंत हा पुरस्कार दिला गेलाय. क्षेत्र कोणतेही असो, प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करत स्वतंत्र ओळख उभी करणाऱ्या, जिद्दीने ध्येय गाठणाऱ्या, कला साहित्य सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांची पुरस्कारासाठी निवड होते.