उल्हासनगरातील भूमाफियांची चौकशी क्राईम ब्रान्चकडे ; खंडणीचा खोटा गुन्हा बुमरॅंग होणार !

उल्हासनगरातील भूमाफियांची चौकशी क्राईम ब्रान्चकडे ; खंडणीचा खोटा गुन्हा बुमरॅंग होणार !

उल्हासनगरातील भूमाफियांची चौकशी क्राईम ब्रान्चकडे ; खंडणीचा खोटा गुन्हा बुमरॅंग होणार !

उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची व हितसंबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता घोटाळेबाजांवरच बुमरॅंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

 

मागील महिन्यांत २८ तारखेला हिललाईन पोलिस स्थानकात १ कोटी रुपयांची खंडणी मागत ५ लाख खंडणी घेतल्याबाबतचा खोटा गुन्हा कोणतेही पुरावे नसतांनाही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील व शैलेश तिवारी यांच्याविरोधात पोलिसांनी नोंद केला.

अश्या खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होवू शकतात, याबाबत ॲड. पाटील यांनी लेखीपत्राद्वारे अगोदरच पोलिस विभागाला कळविले होते. तरीही, पोलिसांनी कसलीही खातरजमा न करता अधिकारांचा गैरवापर करत घोटाळेबाजांशी संगनमत करत गुन्हा दाखल केला.

त्याविरोधात पीडित सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट पोलिस आयुक्त कार्यालयावरच धडक देत बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला.

उल्हासनगर महानगरपालिकेतील नगररचनाकार ललित खोब्रागडे यांचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ॲड. पाटील यांनी केला.

३ जाने २०२५ रोजी पोलिस आयुक्त , ठाणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू झाल्याचं कळताच माजी राज्यमंत्री तथा मा. आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रकरण जाणून घेतलं व पोलिस आयुक्तांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

त्या अनुषंगाने मा. पोलिस आयुक्तांनी सदर तपास स्वतःच्या निरीक्षणात क्राईम ब्रांचकडे सखोल चौकशीकरीता सुपूर्द करत असल्याचे आदेश देत संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

या चौकशीतून उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याची पाळंमुळंही खणली जाण्याची शक्यता असून सामाजिक कार्यकर्त्यांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न घोटाळेबाजांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अलिकडच्या काळात भ्रष्टाचार, घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्ते तसंच नागरिकांना कायद्याचा धाक दाखवण्याचे प्रकार वाढले असून त्या विरोधात समाजात असंतोष आहे. त्यामुळेच की काय, या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व वकील सामील झाले होते.

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account