गेटवेवर नौबत वाजवणाऱ्या शिवप्रेमी ‘मेहबूब’ ला मनसे देणार मानधन ! !

गेटवेवर नौबत वाजवणाऱ्या शिवप्रेमी ‘मेहबूब’ ला मनसे देणार मानधन ! !

गेटवेवर नौबत वाजवणाऱ्या शिवप्रेमी ‘मेहबूब’ ला मनसे देणार मानधन ! !

मराठा साम्राज्याच्या काळात सूर्यास्त झाला की किल्ल्यांवर नौबत वाजवला जायची आणि त्याचबरोबर किल्ल्यातील माणसं बाहेर जाऊ शकत नव्हते आणि बाहेरचे आत येऊ शकत नव्हते. नौबत वाजवण्याची परंपरा आजही मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' इथे सुरू आहे, हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. कुलाब्याला राहणारे मेहबूब मदुनावर १९९६ पासून हे काम नियमितपणे करताहेत. त्यासाठी त्यांना कुठलंही मानधन मिळत नव्हतं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मेहबूब यांना दरमहा मानधन देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी तशी घोषणा केलीय.

निष्ठावान शिवप्रेमी असलेल्या मेहबूब यांचं कुटुंब कर्नाटकचं. त्यांचे वडिल कामानिमित्त धारवाडहून मुंबईत आले. मेहबूब यांचा जन्म मुंबईतच झाला. 'गेटवे ऑफ इंडिया येथे १९८२ पासून नौबत वाजवली जात आहे. १९९६ पर्यंत बाबुराव दीपक जाधव नौबत वाजवत. त्यानंतर त्यांना नौबत वाजवणं शक्य नसल्यानं ते काम मेहबूब यांच्याकडे आलं. गेली २९ वर्ष रोज सुर्यास्ताच्यावेळी मेहबूब ही नौबत वाजवतात

मेहबूब यांना या कामाचं मानधन मिळत नाही. ते शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी हे काम करत आहेत. उदरनिर्वाहासाठी ते कधी गेट वे ऑफ इंडिया परिसरात पाण्याची बॉटल, चणे फुटाणे, टोप्या तर कधी फिरून विविध वस्तू विकतात. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी सांगितलं की जेव्हा मी मेहबूबभाईंशी नौबत वाजवण्यासंदर्भात बोललो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भरभरून बोलत होते.

मनोज चव्हाण

नक्की त्या काळीही मी कुठल्या ना कुठल्या कामी आलो असणार, त्यामुळेच महाराजांना मानवंदना देण्यासाठी नौबत वाजवण्याचं पुण्य मला लाभलं, असं मेहबूबभाई म्हणाल्याचं मनोज चव्हाण सांगतात.

कुलाबा नेव्हीनगर येथील गीतानगर मध्ये एकावर एक मजला बांधलेल्या दहा बाय दहाच्या खोलीत मेहबूब आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून कोणतंही मानधन दिलं जात नाही. पण महाराजांची नौबत वाजवणं हेच मला गौरवास्पद वाटतं, असं मेहबूब सांगतात.

गेट वे ऑफ इंडियाला येणारे पर्यटक त्यांना 'महाराजांचा मेहबूब' म्हणून ओळखतात. आता मनसेने त्यांना नियमित मानधन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या घटनेची राज्य सरकार कशी दखल घेतं, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. 

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account