अलिकडेच बेपत्ता व्यक्तिंच्या तपासात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन केलं जावं, या मागणीसाठी ठाण्याच्या पोलिस आयुक्तलयासमोर राज असरोंडकर यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन होणार होतं. मात्र, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बेपत्ता व्यक्तिंच्या प्रकरणात मार्गदर्शक निर्देशांचं पालन करण्याचा आदेश नव्याने जारी केल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आलं, मात्र या निमित्ताने ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील बेपत्ता व्यक्तिंच्या तपासाला वेग आलेला दिसतोय. उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्यात दाखल १२ गुन्ह्यांतील बेपत्ता मुलामुलींना हुडकून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे, तेही विविध राज्यांतून !
पोलिस आपलं काम करतच असतात, पण जिथे नागरीक जागरूक असतात, तिथे पोलिसांच्या कामाला पाठबळ मिळतं, वेग येतो आणि सफलताही मिळते.
#चलाबेपत्तामुलींनाहुडकूनकाढू ही कायद्याने वागा लोकचळवळ आणि कल्याण विकासिनी यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन सुरू केलेली शोधमोहीम ! ही शोधमोहीम नागरिकांमध्ये जागरुकता आणण्यासाठीही आहे आणि पोलिसांवर दबाव निर्माण करण्यासाठीही ! या मोहिमेच्या सकारात्मक दबावामुळे ठाणे पोलिस आयुक्तालय बेपत्ता व्यक्तिंच्या तपासात नव्याने सक्रीय झालं असून, तसे आदेशच पोलिस आयुक्तांकडून जारी झाले आहेत.
हिल लाईन पोलीस स्टेशनकडील भा.द.वि.कलम ३६३ तसंच भा. न्या. स.कलम १३७(२) गुन्ह्यातील पिडित मुलामुलींचा शोध घेणेकामी PSI धुमाळ, PSI मोरे, HC पवार, HC गुरव असं तपासपथक स्थापन करण्यात आलेलं होतं.
बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन सदर तपास पथकास बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगालात तपासकामी पाठविण्यात आलेलं होतं.
सदर तपास पथकाने पीडित मुलांचा शोध घेऊन खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) गु.र. क्र.123/ 25 मधील पिडित नामे ABC वय 14 वर्ष गुरगाव, हरियाणा.
२) गु.र.क्र.185/23 मधील पीडिता SPG, वय-13 वर्ष, ही सिद्धार्थ नगर, कटेला पोलीस ठाणे, सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश.
३) गु.र. क्र. 224/22, IPC -363 मधील पीडिता नामे TYZ, वय -13 वर्षे राहणार-आझमगड, मेहनगर पोलीस स्टेशन, अजमगड
४) गु.र. क्र. 589/25, BNS -137(2) मधील पीडित मुलगा SWC, वय -16 वर्षे राहणार- हाथरा, साकिम झिलोरिया, थाना - कुशेश्वर, दरभंगा, बिहार
५) गु.र. क्र. 375/22, IPC 363 मधील पीडिता WBC, वय 16 हीचा रेंडर, जिल्हा- जलोन, राज्य उत्तर प्रदेश
६) गु.र. क्र. 445/25, BNS -137(2) मधील पीडित EQB, वय -16 वर्षे राहणार- विजयी, थाना - घोडासहन, पूर्वी चंपारण्य, मोतीहारी,बिहार
७) गु.र. क्र.532/25, BNS 137(2), मधील पीडिता QWA, वय १७ वर्षे, रा. रवींद्र नगर, उल्हासनगर तिचा शोध घेतला असता ती मुफ्फसिल पोलीस स्टेशन येथे मिळाली आहे.
पोलिसांच्या तपास पथकाने एकूण १२ गुन्ह्यांमधील मुलामुलींचा त्यांच्या मूळ राज्यात जाऊन शोध घेतला असता, त्यापैकी एकूण ७ गुन्ह्यातील पीडित मुलांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सापडून आलेली सगळी मुलं बेपत्ता झाली तेव्हा अल्पवयीन होती. त्यांचं अपहरण झालं होतं की ती स्वतः पळून गेली होती, याचा पोलिस तपास करत आहेत.
सदर टीम गेले १५ दिवसांपासून उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथे आहे.