हिंदी सक्ती विरोधातील मराठी भाषिकांच्या लढ्याला सिंधी भाषिकांचंही समर्थन !!

हिंदी सक्ती विरोधातील मराठी भाषिकांच्या लढ्याला सिंधी भाषिकांचंही समर्थन !!

हिंदी सक्ती विरोधातील मराठी भाषिकांच्या लढ्याला सिंधी भाषिकांचंही समर्थन !!

महाराष्ट्र सरकार करू पाहत असलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठीजनांमध्ये मोठा असंतोष आहे. एक मोठा लढा हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात उभा राहू पाहत आहे. मराठी अभ्यास केंद्राने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या लढ्याचे लोण मराठी वर्तुळाबाहेर आता सिंधी भाषिकांपर्यंत गेलं आहे.

उल्हासनगरातील गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक भारत राजवानी यांनी हिंदी सक्तीविरोधातील मराठी भाषिकांच्या संघर्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

हिंदी भाषेच्या प्रभावामुळे ज्या भाषांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, त्यात आमची सिंधी ही मातृभाषा सुद्धा आहे, असं भारत राजवानी यांचं म्हणणं आहे. भारत राजवानी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे आणि प्राथमिक स्तरावर मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी केली आहे.

हिंदी भाषेच्या प्रभावामुळे मराठी, भोजपुरी अशा कित्येक भाषांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे आणि त्यात सिंधी भाषेचाही समावेश असल्याने सिंधी भाषिकांनी मराठी भाषिकांच्या सुरू असलेल्या लढ्याला समर्थन दिले पाहिजे, असं आवाहन भारत राजवानी यांनी केलं आहे.

सध्याच्या आधुनिक काळात मातृभाषेतील शिक्षण लोकांना दुय्यम वाटते, त्यामुळेच भारतीय संविधानाने अल्पसंख्य भाषा म्हणून सिंधी भाषेला दिलेले संरक्षण व भाषा संवर्धनाची दिलेली संधी आपण विसरलो आहोत. त्यातून बाहेर पडून सिंधी भाषेतूनही शिक्षण मिळावे यासाठी सरकारला आग्रह केला पाहिजे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद ३५०(क) नुसार, भाषिक अल्पसंख्यांकांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासंदर्भात सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे, असं भारत राजवानी यांनी म्हटलं आहे.

Raj Asrondkar

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account