कुविख्यात गुन्हेगार दीपक सपके याचा पंधरा वर्षांपूर्वीच एन्काऊंटर होणार होता. मुंबई ठाणे परिसरासह राज्यातील विविध दरोड्यांच्या गुन्ह्यांसाठी तो पोलिसांना हवा होता. डोंबिवलीतील विकास मात्रेच्या कोणाची सुपारी घेतल्याचाही आरोप दीपक सपकेवर होता.
तो त्यावेळी एन्काऊंटर मधून वाचला होता कारण पोलिसांच्या त्या पथकात वादग्रस्त भ्रष्ट पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर होते. आंधळकर अलिकडेच सपकेच्या वाढदिवसाला आवर्जून हजर राहिले होते. तिथे त्यांनी सपकेचं तोंड भरून कौतुकही केलं होतं. दीपक सपकेचं एन्काऊंटर कसं टळलं होतं त्याचं उत्तर आपल्याला आंधळकर यांच्या वाढदिवसाला लावलेल्या उपस्थितीतून आणि तिथे केलेल्या भाषणातून मिळतं.
स्वतः भाऊसाहेब आंधळकर यांना आरटीआय कार्यकर्ता सतीश शेट्टी हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. विविध कारणांनी आंधळकर नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आहेत.
आता दीपक सपके आणि भाऊसाहेब आंधळकर या दोघांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचा फोटो समाजमाध्यमात प्रसारित झाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावूनच छोटा राजन टोळीतला कुविख्यात गुन्हेगार दीपक सपके उभा असलेला आपल्याला छायाचित्रात दिसतं. एकनाथ शिंदे जोपासत असलेलं बाळासाहेबांचं आणि दिघेंचं हिंदुत्व ते हेच काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
भाऊसाहेब आंधळकर दीपक सपकेच्या वाढदिवस कार्यक्रमात काय म्हणाले होते ऐकण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा :