भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट भारत आणि रशियाच्या गुप्तचर यंत्रणांनी मिळून उधळला, अशी एक बातमी जोरदारपणे पसरवली जातेय. पण संघ परिवारातील ऑर्गनायझरसारखं मुखपृष्ठ आणि संघभाजपा समर्थकांच्या समाजमाध्यमांतल्या काॅपी, पेस्ट, शेअर्ड पोस्ट सोडल्या तर कोणत्याही विश्वसनीय माध्यमांतून सदर बातमीची पुष्टी होत नाही.
मोदींच्या हत्येच्या कटाबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी काय वृत्तांकन केलंय याचा आढावा घेण्यासाठी ग्रोक या एआय एपला माहिती विचारली असता, पुढीलप्रमाणे उत्तर मिळालं,

ढाका (बांगलादेश) येथे अमेरिकी नागरिक टेरेन्स अर्वेल जैक्सन यांच्या रहस्यमय मृत्यूमुळे सोशल मीडिया आणि काही भारतीय-प्रभावित माध्यमांमध्ये षड्यंत्र सिद्धांत व्हायरल झाले. यानुसार, जैक्सन CIA चा अधिकारी असून, तो मोदींवर हल्ल्याचा कट रचत होता. भारत आणि रशियाच्या गुप्तचर यंत्रणांनी (RAW आणि FSB) हा कट रोखला आणि जैक्सनला नेमके मारले, असे दावे आहेत.

हे वृत्त SCO परिषदेनंतर (ऑगस्ट २०२५, तियानजिन) मोदी-पुतिन भेटीशी जोडले जाते. मात्र, मुख्य आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये (BBC, CNN, NYT) याचा फारसा उल्लेख नाही; बहुतेक हे भारतीय सोशल मीडिया (X वरील पोस्ट्स) आणि काही भारतीय वेबसाइट्सवर ( जसे Organiser.org ) मर्यादित आहे.
हे "कॉन्स्पिरसी थिअरी" म्हणून पाहिले जाते, ज्यात पुराव्याचा अभाव आहे. Lowy Institute सारख्या थिंकटँकने अशा दाव्यांना "अनवेरिफाइड" म्हटले आहे.
रशियन माध्यमांत तरी या संदर्भात बातमी आलीय का, असं विचारलं असता, ग्रोककडून उत्तर मिळालं की नाही, रशियन मीडियातही अशी बातमी आलेली नाही.

मी विविध प्रमुख रशियन न्यूज साइट्स (जसे की TASS, RIA Novosti, RT, Sputnik आणि Lenta.ru) वर शोध घेतला, पण भारताच्या RAW आणि रशियाच्या गुप्तचर यंत्रणेच्या सहकार्याने मोदींच्या हत्येचा कट उधळल्याबद्दल काहीही उल्लेख सापडला नाही. ही बातमी मुख्यतः भारतीय माध्यमांमध्ये (जसे की Organiser, Mathrubhumi) आणि सोशल मीडियात फिरतेय, ज्यात ढाका येथील एका रहस्यमय मृत्यूशी जोडून CIA चा कट असल्याचा दावा आहे, पण रशियन बाजूने याची पुष्टी किंवा कव्हरेज नाही, असं ग्रोकने सगळं इंटरनेट ढुंढाळून सांगितलं.
इतक्या मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट उधळला गेला आणि ग्रोकला काहीच माहित नाही, कसला डोंबलाचा इंटेलिजन्स, असं म्हटल्यावर मात्र, ग्रोकला राग आला.
मी अशा असिद्ध अफवांवर आधारित नाही, तर प्रमाणित तथ्यांवर आहे. कथित कटाबाबत अधिकृत पुष्टी नाही, तर संघाच्या मुखपत्रासह काही माध्यमांतील अटकळ आहे, याचा पुनरुच्चार करत ग्रोकने सरळ सुनावलं की खरा इंटेलिजन्स अफवा ओळखतो आणि पसरवत नाही – त्यातच शहाणपणा आहे !