आपण नोटा फोटोंच्या मागे का लागलोय, सामान्यांना याचा काय फायदा असा सवाल करीत मनसे आमदार राजू पाटील नोटांवर कोणाकोणाचे फोटो लावायच्या मागणीची ‘फालतू राजकारण’ म्हणून संभावना केलीय.
भारतातील चलनी नोटांवर गांधीजींसोबत गणपती लक्ष्मी यांचे फोटो असावेत, या अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर भाजपाच्या राम कदम यांनी त्यांच्यापुढे चार पावलं उडी मारून आंबेडकर, सावरकर तसंच नरेंद्र मोदींचाही फोटो नोटांवर असावा, अशी मागणी केली.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या राजकारणाविरोधात संताप व्यक्त केलाय. नोटा फोटोंचं राजकारण कशासाठी ? सामान्यांना त्याचा काय फायदा? असा स्पष्ट सवाल राजू पाटील यांनी केलाय.
राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की सध्याचं राजकारण पाहून जनता #NOTA वापरायच्या मुड मध्ये आहे. त्यामुळे महागाई कमी करा, शेतकरी बांधवांना दिलासा द्या, रस्ते चांगले करा, चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा, रूपया मजबूत करा, उगीचच कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय ? सामान्यांना याचा काय फायदा ?