मुलींनी हिंमत जपून ठेवावी ! तीच आयुष्य उभं करेल !!

मुलींनी हिंमत जपून ठेवावी ! तीच आयुष्य उभं करेल !!

मुलींनी हिंमत जपून ठेवावी ! तीच आयुष्य उभं करेल !!

प्रियांका मोगरे ही झोमॅटो कंपनीत काम करणारी २८वर्षीय युवती मागील वर्षी वाहतूक पोलिसांशी वाद घातला, म्हणून तिला एक वर्षापेक्षा जास्त काळ भाईखळा तुरूंगात डांबवण्यात आलेली. प्रियांकाला जामीन मंजूर होता, परंतु जामीनाची रक्कम भरता न आल्यामुळे तिची सुटका झालेली नव्हती. प्रियांका इथल्या अव्यवस्थेची बळी ठरली होती.

७ ऑक्टोबर २०२०ला प्रियांकाची भाईखळा जेलमधून सुटका झाली. मुंबईतील प्रयास या संस्थेसोबतच प्रियांकाला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर तसेच इतर कार्यकर्त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. पण कायद्याने वागा लोकचळवळीने कुठल्याही प्रकारचा बोलबाला केला नाही. वुई बिलिव इन साईलेंट रिवाॅल्यूशन, हे कायद्याने वागा लोकचळवळीचं तत्त्व आहे.

या सर्व कालावधीत प्रियांकाला आपल्या ३ वर्षाच्या मुलीपासून दूर राहावं लागलं. एक स्त्री म्हणून व आई म्हणून प्रियांकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अव्यवस्थेने प्रियांकाला तुरुंगात डांबले नाही तर तिच्या एका छोट्याशा कृतीची शिक्षा तिच्या मुलीलाही सहन करावी लागली . या सगळ्याचा प्रियांकाच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप पारिणाम झाला. इथली अव्यवस्था, इथला समाज या सर्व गोष्टीला कारणीभूत ठरत आहे.

प्रियांका ही एक मुलगी म्हणून पोलिसांशी हुज्जत घालत होती, म्हणूनही तिला हे सगळ सहन कराव लागलं. एक मुलगी म्हणून ती पोलीसांसोबत चढ्या आवाजात बोलली म्हणून पोलिसांचा ईगो दुखावला गेला असावा. तिला तुरूंगात डांबल गेल. याच ठिकाणी एखाद्या मुलाने जर हा वाद घातला असता तर तिथल्या तिथे प्रकरण मिटलं असतं. कदाचित पुढचा मनस्ताप त्याला सहन करावं लागलाही नसता ; कारण आपल्या समाजाची तशा प्रकारची मानसिकता झालेली आहे.

प्रियांका जर एखादी सेलिब्रेटी असती तर माध्यमांनी तिच्यावरच्या अन्यायाचं प्रकरण उचलून धरलं असतं. तिचा हुज्जत घालतानाचा विडियो ज्या वेगाने पसरला त्याच वेगाने तिच्या पुढील आयुष्याची व्यथाही पसरायला हवी होती.

पण इथल्या व्यवस्थेने ठरवून ठेवलेलं आहे की लोकांनी काय पसरवायचं आणि लोकांना काय पाहू द्यायचं? प्रियांकाने ज्या प्रकारे हुज्जत घातली ते इथल्या व्यवस्थेला दिसलं, मग तिच्या वेदना व्यवस्थेला का दिसल्या नाहीत? अशा कितीतरी प्रियंका आज अव्यवस्थेला बळी पडत आहेत.

तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर प्रियांकाची पुन्हा नव्याने लढाई सुरू झाली आहे. प्रियंका अलिकडेच महाराष्ट्राच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना भेटली. मिडिया भारत न्यूजमध्ये ही बातमी मी ऐकली. त्या तिला म्हणाल्या, तुझ्यातली हिंमत जपून ठेव. तीच तुझं आयुष्य पुन्हा उभं करेल.

स्त्री म्हणून जन्मतः प्रत्येक स्त्रीमध्ये हिम्मत असते. ती प्रत्येक स्त्रीने वापरली पाहिजे. इथल्या अव्यवस्थेला व पुरुषसत्ताक मानसिकतेला उत्तर देण्यासाठी व मोकळं आकाश मिळवण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपली आंतरिक ताकद वापरायला हवी, असंच यशोमती ठाकूर इथल्या प्रत्येक स्त्रीला सूचवू पाहताहेत.

 

 

रेश्मा कांबळे

उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी. कायद्याने वागा लोकचळवळ तसंच मिडिया भारत न्यूज ची प्रतिनिधी


मिडिया भारत न्यूज चं मुडमाॅर्निंग दुनिया बुलेटीन – ६९ ऐकण्यासाठी टिचकी मारा :

 


MediaBharatNews

comments
 • केशव पुंजाराम हिंगाडे

  October 22, 2020 at 10:50 am

  सुरेख लेख

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!