मैत्रकूलच्या किशोर जगतापविरोधातील लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात कलमं वाढली ! १८ मार्चपर्यंत पोलिस कस्टडी !!

मैत्रकूलच्या किशोर जगतापविरोधातील लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात कलमं वाढली ! १८ मार्चपर्यंत पोलिस कस्टडी !!

मैत्रकूलच्या किशोर जगतापविरोधातील लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात कलमं वाढली ! १८ मार्चपर्यंत पोलिस कस्टडी !!

पोलिसांनी आपला मोर्चा मैत्रकूलमधील 'सिनिअर्स'कडे वळवताच इतके दिवस लपून बसलेला किशोर जगताप बाहेर आला आणि पडघा पोलिसांसमोर हजर झाला. रात्री उशीरापर्यंत चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केलीय. भिवंडी सत्र न्यायावयाने त्याला १८ मार्चपर्यंत पोलिस कस्टडी सुनावलीय. किशोर जगतापविरोधात आधी जी कलमे लावण्यात आली होती, त्यात वाढ करण्यात आल्याचं तपास अधिकारी एपीआय नितीन मुदगुन यांनी 'मीडियाभारत'ला सांगितलं.

किशोर जगतापवर मैत्रकूलमधील काही मुलींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एका मुलीच्या तक्रारीवरून ८ डिसेंबर २०२३ रोजी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून किशोर जगताप फरार झाला होता. गुन्हा पडघा पोलिसांच्या हद्दीतील असल्याने तो त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला. पण किशोर जगतापला शोधण्याचे कोणतेही युद्धपातळीवरचे प्रयत्न पडघा पोलिसांनी केले नाही. उलट त्याला अटकपूर्व जामीनासाठी पुरेपूर संधी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवी मुंबईतील विधी विभागाची टीम किशोर जगतापच्या सहाय्यासाठी धावून आली. मात्र, भिवंडी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

त्यानंतरही, पोलिस अटकेबाबत उदासीनच होते. परंतु, शासनाकडे तक्रारी गेल्यावर दबाव आला व तपास अधिकारी बदलल्यावर पोलिसांची तपासगाडी वेगाने पळू लागली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. त्यानंतर, पोलिसांनी किशोर जगतापच्या निकटवर्तीय 'सिनिअर्स'नाच हात घातल्यावर मात्र त्याचा नाईलाज झाला आणि त्याला पोलिसांसमोर शरण यावं लागलं.

आपण हजर होत असल्याची शेखी किशोर जगतापने फेसबुकवर मिरवू पाहिली, पण त्याला अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. 'सत्यमेव जयते' राहूदे बाजूला, आधी लपून का बसला होतात ते सांगा, असं अनेकांनी खडसावलं. आपण निर्दोष असून आपल्याविरोधात कुभांड रचलं गेल्याचा बचाव किशोर जगतापने फेसबुकवरून केलाय.

दरम्यान, एका बाजूला किशोर जगतापचे समर्थक फेसबुकवर कार्यरत झाले असून, दुसरीकडे त्याचा भांडाफोड करणारी मुलंमुलीही आक्रमक झाली आहेत. इतके दिवस अप्रत्यक्ष टीकाटीपणी करणाऱ्या किशोर जगतापच्या एकेकाळी समर्थक असलेल्या मुलामुलींनी त्याचे कारनामे उघडपणे व सविस्तरपणे समाजमाध्यमात मांडायला सुरुवात केल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!