खाण कामगारांसाठीच्या निधीतून मतदारांवर मोफत वस्तुंची खैरात ; उल्हासनगरात आचारसंहितेचं खुलं उल्लंघन !

खाण कामगारांसाठीच्या निधीतून मतदारांवर मोफत वस्तुंची खैरात ; उल्हासनगरात आचारसंहितेचं खुलं उल्लंघन !

खाण कामगारांसाठीच्या निधीतून मतदारांवर मोफत वस्तुंची खैरात ; उल्हासनगरात आचारसंहितेचं खुलं उल्लंघन !

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र नेमकं कुठल्या खाणकामामुळे प्रभावित आहे, कोण जाणे, पण प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत निधीतून उल्हासनगरात घरघंटी व शिवणयंत्रांचं वाटप सुरू आहे, तेही खुलेआम निवडणूक आचारसंहितेच्या काळात ! हा गैरप्रकार उघडकीस आल्यावर मनपा प्रशासनाने अत्यंत कोडगेपणाने हात वर केले आहेत. 

उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत वितरणाचं काम आचारसंहितेत अडकलेलं असताना, बिझनेस सोल्युशन नावाची एक कंपनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नागरिकांना बोलावून घरघंटी आणि शिवणयंत्र वाटप करीत असल्याचं उघड  झालं आहे.

'स्वानंद न्यूज' या युट्यूब वृत्तवाहिनीने सगळा गैरप्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. उल्हासनगर पश्चिमेकडील एका शाळेत जाऊन वृत्तवाहिनीचे संपादक नंदकुमार चव्हाण व इतर काही पत्रकारांनी घरघंटी व शिवणयंत्राचं वाटप केलं जात असतानाचं शूटींग तर केलंच, शिवाय लाभार्थी महिलांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.

मात्र, महिला बाल कल्याणचे विभागप्रमुख नितेश रंगारी यांनी शिवण यंत्र आणि घरघंटीचं वाटप महानगरपालिकेकडून होत नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, महापालिकेतीलच दुसऱ्या मजल्यावरील निवडणूक कक्षात शिवणयंत्र आणि घरघंटीसाठी लाभार्थ्यांची डेटा एन्ट्री सुरू असल्याचंही पत्रकारांनी कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

बिझनेस सोल्युशन नावाच्या कोण्या कंपनीच्या त्या कर्मचाऱ्यांनी घरघंटी वाटपाचं काम दुसरी टीम करीत असल्याचं कॅमेऱ्यासमोर कबूल केलं आहे.

विशेष म्हणजे त्याच मजल्यावर उपायुक्त डाॅ. सुभाष जाधव यांचं दालन आहे, पण त्यांनीही सगळ्या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचा आव आणला.

१५६५ घरघंटी व १६३२ शिवणयंत्रं अश्या ३१९७ महिलांना मोफत सामान वाटप होणार आहे. घरघंटीची किंमत अंदाजे दहा ते तेरा हजार तर शिवणयंत्राची किंमत पाच ते आठ हजार आहे. या वस्तुंच्या वाटपासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया झालेली नाही. ठेकेदार नेमला गेलेला नाही. मात्र, वस्तुंचं मोफत वाटप सुरू आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीने स्वानंद न्यूजवरील बातमीच्या अनुषंगाने, सदरबाबत निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार केली असून, चौकशीची व संबंधित कंपनी, वाटपामागचे खरे सूत्रधार व मनपा अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. सदरची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने ईमेलला दिलेल्या उत्तरात कळवलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!