गोतस्करांशी संगनमत करून बजरंग दलाच्या गुंडांनी कापली गाय !

गोतस्करांशी संगनमत करून बजरंग दलाच्या गुंडांनी कापली गाय !

गोतस्करांशी संगनमत करून बजरंग दलाच्या गुंडांनी कापली गाय !

गोरक्षणाच्या नावाखाली खंडणीखोरी करीत असल्याचा आरोप बजरंग दलिवर वारंवार झालाय. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून मध्यप्रदेशात बजरंग दलाच्या गुंडांचं रॅकेट पकडलं गेलं होतं. मध्यप्रदेशातच खंडणीसाठी एका तेल व्यापाऱ्याच्या ५ वर्षाच्या जुळ्या मुलांच्या हत्येच्या आरोपात बजरंग दलाचे पदाधिकारी पकडले गेले होते. आता बजरंग दलाचा उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष मोनू बिश्नोई आणि त्याचे दोन कार्यकर्ता रमन चौधरी व राजीव चौधरी यांना गोहत्येच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलीय.

स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या बजरंग दलावर गुन्हेगारीचा आरोप नवा नाही. हिंदुत्ववादी मुखवटा धारण केला की गुंडगिरीचा जणू परवानाच मिळून जातो, अशा अविर्भावात बजरंग दलाचे गुंड वावरत असतात. हव्या त्या ठिकाणी दंगली घडवायला, विद्वेष पसरवायला, वातावरण तापवणारी प्रक्षोभक वक्तव्ये करायला  बजरंग दलाचे गुंड संघभाजपाच्या कामी येतात. परंतु, प्रकरण जेव्हा गोहत्येशी संबंधित असतं, तेव्हा संघभाजपाई सरकारांची हालत ' सहन होत नाही आणि सांगताही येत नाही', अशी होऊन जाते.

शिवाय, कायदेशीर कारवाई करताना आम्ही आपलंतुपलं करत नाही, याचा देखावा करायला अशी नाईलाजाने केलेली कारवाईची प्रकरणं कामाला येतात.

गैरधंद्यांना संरक्षण देण्यासाठी गुंड मोनू बिश्नोईचा पोलिसांवर सतत दबाव असायचा. अलिकडेच हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली तो अटकेत होता. जामीनावर बाहेर आल्यावर त्याचा पोलिसांवरचा दबाव वाढला होता. पण पोलिस प्रतिसाद देत नव्हते. अखेर स्थानिक वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अडकवण्यासाठी मोनू बिश्नोईने शहाबुद्दीनची मदत घेतली.

एका गाईचं मुंडकं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शहाबुद्दीनवर होती. हरिद्वारला जाणाऱ्या कावड यात्रेच्या मार्गावर ते मुंडकं टाकण्यात आलं आणि मग गोहत्या झाल्याची ओरड करत पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, म्हणून बजरंग दलाच्या गुंडांनी पोलिसांवर दबाव टाकायला सुरूवात केली.

काही दिवसांनी त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक गाय मारून टाकण्यात आली. ही कामगिरीसुद्धा मोनू बिश्नोईच्या सुपारीवरून शहाबुद्दीननेच बजावली होती. एका बाजूला पोलिसांची सतावणूक करायची आणि दुसऱ्या बाजूला शहाबुद्दीनचा हाडवैरी मकसूदला अडकवायचं, असं मोनू बिश्नोईचं कटकारस्थान होतं.

पोलिसांना मात्र एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांवरून काहीतरी गडबड आहे, असा संशय होता. मकसूदविरोधात काहीच पुरावे दिसून येत नव्हते. मग काही खबरींवरून पोलिसांनी आपला तपास बजरंग दलाकडे वळवला. आपलं सगळं कौशल्य पणाला लावून पोलिसांनी घटनांमधलं गूढ उकललं आणि शेवटी मोनू बिश्नोईविरोधात गुन्हा दाखल केला.

गेल्या वर्षी रामनवमीच्या काळात दंगल घडवण्याच्या उद्देश्याने गाय कापल्याच्या आरोपावरून हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना अटक झाली होती. 

गोहत्येच्या गुन्ह्यात अडकलेले गुन्हेगार हिंदुत्ववादी संघटनांचे असले की राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर अशा घटनांवर फारशी चर्चा होत नाही. समाजमाध्यमातही हिंदुत्ववादी गप्पगार असतात.

काही जण निर्लज्जपणे 'सगळेच तसे नसतात' म्हणत बजरंग दलसारख्या देशविरोधी संघटनांचं केविलवाणं समर्थन सुरू ठेवतात. त्यामुळेच खंडणी, हत्या, गोहत्येपासून ते अगदी पाकिस्तानसाठी भारतीय सैन्याची हेरगिरी करेपर्यंतचे गुन्हे या संघटनांमधील गुंडांना पुन्हा पुन्हा बिनदिक्कतपणे करता येतात.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!