कायद्याने वागा हे तुमचं माझं जगणं झालं पाहिजे !

कायद्याने वागा हे तुमचं माझं जगणं झालं पाहिजे !

कायद्याने वागा हे तुमचं माझं जगणं झालं पाहिजे !

We believe in silence revolution… कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर आमच्या बैठकांत हे वाक्य नेहमी उच्चारतात ! ३ व ४ जुलै रोजी बदलापूरला झालेल्या ऋतूसंगत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात राजसरांनी त्याचा पुनरुच्चार केला आणि अनेकविध उदाहरणं देत, ते सार्थही ठरवलं.

कायद्याने वागा लोकचळवळ ही 2009 पासून सुरू आहे. जे प्रश्न समस्या, अडचणी समाजामध्ये दिसत आहेत. ते का सुटत नाही? अशा समस्या संविधानिक मार्गाने कशा सोडवल्या जातील ? याचा विचार करून कायद्याने वागा लोकचळवळीची स्थापना करण्यात आलीय. पण त्यासाठी लोकांची एकजूट हवी.

आपण जातीधर्मातून सुटका करून घेतली तरी अमूकवादी-तमूकवादी बनतोच आणि पुन्हा विखुरलेलोच राहतो. सर्वसामान्य लोकांची मूळ मानसिकताच भ्रष्ट असते आणि कुठलाही राजकीय नेता हा समाजाचंच प्रतिबिंब असतो. त्यामुळे आपण आपल्याच चक्रव्यूहात अडकत गेलो आहोत, असं मत राज असरोंडकर मांडतात.

लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात नसतात, तर भ्रष्टाचारातल्या महागाईच्या विरोधात असतात. कमी लाच देऊन काम झालं तर ते खूश असतात. सिस्टमला भिडणारा असा आपला स्वभाव नसतो. आपलं काम होण्यासाठी देवांनाही लालूच दाखवणाऱ्या लोकांसाठी सरकारी कर्मचारी-अधिकारी किस खेत की मूली, असं सांगत राजसर भ्रष्ट मानसिकतेच्या मूळावरच घाव घालतात.

देशातील 543 खासदारांतील 233 क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारे आहेत. ४५० करोडपती आहेत. याच कारण लोकांची बेजबाबदार मानसिकता असल्याचं ते सांगतात.

आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे, असं म्हटलं जातं. देशातलं पहिलं महिला धोरण महाराष्ट्राने आणल्याचं राजकीय श्रेय घेतलं जातं. पण गेल्या साठ वर्षात विधानसभेत एकूण आमदारांपैकी दहा टक्केही महिला कधी निवडून गेलेल्या नाहीत. सर्वाधिक आकडा २०१९ चा २८८ पैकी २४ हा आहे. पुरोगामी महाराष्ट्रात किमान १०० तरी आमदार महिला असायला हव्या होत्या. पण राजकीय पक्षांना कसलीही ध्येयधोरणं नाहीत. राजकीय पक्ष एकमेकांवर गुन्हेगारीकरणाचे, भ्रष्टाचाराचे आरोप करत नाहीत, ते लोकांच्या मूळ समस्यांवर बोलत नाहीत, असं असरोंडकर स्पष्टपणे सांगतात.

आपल्याकडे लोकशाहीवर, संविधानावर शेकडो संघटना काम करतात ; पण निवडणुकीला उमेदवार उभा राहत नाही तर त्याला उभे केले जातं…हेही भल्याभल्यांना माहित नसतं. it’s not a application, it’s a nomination. लोकांनी उमेदवार ठरवावा, त्याचं नामनिर्देशन करावं, लोकवर्गणीतून प्रचार करावा आणि मेहनत करून निवडून आणावं व त्यानंतरही त्याच्यावर विधायक दबाव ठेवावा, ही खरी लोकशाही ! पण आपल्या मूर्खपणामुळे किंवा गुलाम मानसिकतेमुळे लोक आपली सत्ता दुसऱ्याच्या हातात देतात, आपण राजकीय पक्षांच्या सोयिस्कर सापळ्यात अडकलो आहोत, हे राजसर निदर्शनास आणून देतात. आपल्या ओघवत्या शैलीने ते आपल्या मेंदूची दारं खिडक्या उघडून देतात.

निसर्ग हासुद्धा एक नियमच आहे. आपण निसर्गाचा भाग आहोत. त्या नियमाप्रमाणे आपण जगले पाहिजे. पण आपलं जगणं बेशिस्त झालं आहे. भविष्यात हे चित्र बदलायचं असेल तर कायद्याने वागा तुमचं माझं जगणं झालं पाहिजे, असं सांगत राजसर कायद्याने वागा लोकचळवळीचा केंद्रबिंदू स्पष्ट करतात. अव्यवस्था हळूहळू बदलत असते. त्यासाठी आपण बोललं पाहिजे. व्यक्त झालो पाहिजे. शक्य तितके प्रयत्न केले पाहिजे. बदल ही प्रक्रिया आहे, बदल हवा असल्यास प्रक्रिया अपरिहार्य आहे. बदल होताना नाही, तर झाल्यानंतर दिसतो, असं ते मांडतात.

हे लक्षात घेऊनच कायद्याने वागा लोकचळवळीचे सगळेच लोक संयमाने, चिकाटीने आणि सातत्याने पाठपुरावा करत काम करत असतात. त्यात अनेक उदा.देता येतील. नव्याने सुरू केलेल्या मीडिया भारत न्यूज चॅनलचे वृत्त संपादक अंकुश हंबर्डे पाटील एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये जवळ जवळ 6 हजार बातम्यांचं संकलन आहे, जे त्यांच्या current affairs या पेपरच्या कामी येत आहे.

म्हणजे काम करत असताना स्वतः मध्ये बदल घडवत समाज घडवण्याची जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता कायद्याने वागा लोकचळवळ निर्माण करत आहेत. मी तो अनुभव घेतलाय.

पहिल्यांदा मी शिबिरार्थी म्हणून आले होते. कालच्या शिबिरात अनुभवकथन करणारी वक्ता होते. मिडिया भारत न्यूजसाठीही राजसरांनी कॅमेरासमोर उभं केलं. माझा जगण्यातला आत्मविश्वास वाढवण्यात कायद्याने वागा लोकचळवळीचं योगदान आहे.

we believe in silent revolution…असं राज असरोंडकर का म्हणतात, त्याची अनुभूती मी बदलाच्या प्रक्रियेत घेतलीय. म्हटलं तर कायद्याने वागा लोकचळवळ दिसत नाही ; म्हटलं तर शांतपणे खूप काही सुरू आहे.

 

 

 

शालिनी आचार्य

अलिबाग समन्वयक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!