मुसळधार पावसात ठाण्याचे महापौर रस्त्यावर !

मुसळधार पावसात ठाण्याचे महापौर रस्त्यावर !

मुसळधार पावसात ठाण्याचे महापौर रस्त्यावर !

हवामान खात्याने वर्तविलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात ज्या संभाव्य ठिकाणी पाणी साचते, त्या ठिकाणची पाहणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.

महापालिका प्रशासनाने केलेली नालेसफाई समाधानकारक झाली असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना कमी निदर्शनास आल्या, असा दावा महापौरांनी केला. सखल भागात पाणी साचल्याने या ठिकाणी तातडीने पंपिगच्या सहाय्याने पाणी काढण्याच्या सूचना महापौर म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या.

चिखलवाडी, भांजेवाडी, गडकरी रंगायतन परिसर, आंबेडकर रोड, सिडको परिसर, विटावा रेल्वेपूलाखाली जागांची पाहणी आज केली, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आदेश यावेळी महापौरांनी प्रशासनाला दिले. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला तसेच प्रभाग समितीला कळवावं, असं आवाहनही महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना केलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!